शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

जि.प.तील कामकाज प्रभावित

By admin | Published: July 17, 2016 1:07 AM

जिल्हा परिषदेच्या लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड पे मध्ये सुधारणा करण्यात यावी, कर्मचाऱ्यांच्या पाल्यास नि:शुल्क शिक्षण ...

लेखणीबंद आंदोलन सुरू : लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांनी केली निदर्शने गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड पे मध्ये सुधारणा करण्यात यावी, कर्मचाऱ्यांच्या पाल्यास नि:शुल्क शिक्षण सवलत मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी जि.प.च्या लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाभरात शनिवारपासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. जि.प.च्या समोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधून घेतले. सदर लेखणीबंद आंदोलनामुळे जिल्हा परिषदेचे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले. जिल्ह्याच्या बाराही पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, जि.प.संपूर्ण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे तालुकास्तरावरीलही प्रशासकीय कामकाज ठप्प पडले. कर्मचारी शनिवारला आपली हजेरी नोंदविल्यानंतर कार्यालयात बसून होते. कार्यालयातील संगणकही सुरू केले नाही. फाईलही तशाच पडून होत्या. निदर्शनेदरम्यान संघटनेचे अध्यक्ष व्य. वि. कंबगोणी, डी. व्ही. दुमपट्टीवार, फिरोज लांजेवार, अखिल श्रीरामवार, गणेश सुंकरवार, माया बाळराजे, सुनिल लोखंडे, डी. बी. मारबते, टी. डी. सावरे, मनिषा गेडाम, खेवले, योगेश वैद्य, राजू हेमके, सुनिता आत्राम, पी. व्ही. उके, पी. डी. नरड आदी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांना दिले. (स्थानिक प्रतिनिधी)