लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भांडणादरम्यान मुलगी व आईला मारहाण करणाºया तीन आरोपींना प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी ना.च. बोरफलकर यांनी सात दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली असून, २०० रूपये दंड व दोन हजार रूपये नुकसानभरपाई देण्याचा निकाल २ जानेवारी रोजी दिला आहे.गडचिरोली शहरातील गोकुलनगर वॉर्डातील दीपक बावणे, राजू बावणे, कवडू बावणे या तिघा बापलेकांनी ११ आॅक्टोबर २०१६ रोजी भांडणादरम्यान फिर्यादी व फिर्यादीची आई या दोघींना कुºहाडीच्या दांड्याने डोक्यावर मारून दुखापत केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पोलीस स्टेशन गडचिरोली येथे पीडित महिलांनी १२ डिसेंबर रोजी तक्रार केली. पोलीस हवालदार मारोती धरणे यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर न्यायालयात प्रकरण दाखल केले. गडचिरोली न्यायालयाचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी आरोपींना ३२४ कलमान्वये दोषी ठरवून सात दिवस कारावास व २०० रूपये दंड, कलम ५०४ अन्वये तीन दिवस कारावास व ३०० रूपये दंड, कलम ५०६ व ३४ अन्वये सात दिवस कारावास ३०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास कलम ३२४ व ५०४ मध्ये दोन दिवस साध्या कारावासाची शिक्षा तसेच कलम ५०६, ३४ अन्वये तीन दिवस साध्या कारवासाची शिक्षा सुनावली. ३० दिवसांच्या आत फिर्यादिला दोन हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता योगीता राऊत यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार यशवंत मलगाम, कोर्ट मोरर सुभाष सोरते, पवन यवतकर यांनी काम पाहिले.दारूविक्रेत्यास सात दिवसांचा कारावासगोंदिया येथील नितीन होतचंदानी, अमित कारडा व अमर मुलचंदानी यांची दारू कारसह केरोडा बसस्थानकाजवळ गडचिरोली पोलिसांनी १० मार्च २०१७ रोजी कारवाई करून जप्त केली. पोलीस हवालदार सुहास इरमलवार यांनी तपास करून न्यायालयात प्रकरण दाखल केले. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी ना.च. बोरफलकर यांनी २ जानेवारी रोजी निकाल दिला. प्रत्येक आरोपीला सात दिवसांचा कारवास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सात दिवसांचा वाढीव कारवासाचीही शिक्षा सुनावली. जप्त करण्यात आलेले चारचाकी वाहन शासन जमा करण्यात आल्याने त्याबाबतचा आदेश दिला नाही. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता योगीता राऊत यांनी काम पाहिले.
महिलांना मारहाण करणाऱ्यास कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 12:21 AM
भांडणादरम्यान मुलगी व आईला मारहाण करणाºया तीन आरोपींना प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी ना.च. बोरफलकर यांनी सात दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली असून, २०० रूपये दंड व दोन हजार रूपये नुकसानभरपाई देण्याचा निकाल २ जानेवारी रोजी दिला आहे.
ठळक मुद्देसात दिवसांची शिक्षा : प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाºयांचा निकाल