ग्रामपंचायत येडानूर येथे १५ ऑगस्ट २०१७ राेजी ग्रामसभेचे आयाेजन केले हाेते. यावेळी कलापथकातील महिला व पुरुष कार्यक्रम घेऊन कुष्ठराेगाबाबत जनजागृती करीत हाेते. दरम्यान, आराेपींनी कलापथकातील महिलेला अश्लील हातइशारे करून शिवीगाळ केली. याबाबतची तक्रार सदर महिलेने चामाेर्शी पाेलीस स्टेशनमध्ये दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपासी अधिकारी श्यामराव वडेट्टीवार यांनी तपास करून दाेषाराेपपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने सरकारी पक्षाचे साक्ष नाेंदविली.
आराेपींविराेधात सबळ पुरावे आढळून आल्याने चामाेर्शी येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एन. पी. वासाडे यांनी आराेपींना भादंवि कलम २९४, ५०९, ३४ नुसार दाेषी ठरविले. त्यांना सहा महिन्याचा कारावास व ७, ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच फिर्यादी महिलेला एक हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. सरकारी पक्षातर्फे ॲड. डी. व्ही. दाेनाडकर यांनी काम पाहिले.