लोकमत न्यूज नेटवर्ककोरची/एटापल्ली : आॅनलाईन शिक्षक बदली प्रक्रियेला वेग देऊन बदली प्रक्रिया कोणाच्याही दबावाखाली न येता राबवावी, अशी मागणी दुर्गम भाग शिक्षक संघटना तालुका शाखा कोरची, एटापल्लीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरची व एटापल्लीचे तहसीलदार यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.दुर्गम भागातील शिक्षक मागील अनेक वर्षांपासून त्याच गावात कार्यरत आहेत. जिल्हास्तरावर बदली प्रक्रिया राबविली जात होती. मात्र या बदली प्रक्रियेत त्यांच्यावर अन्याय होत होता. शासनाने आॅनलाईन बदली प्रक्रिया सुरू केली आहे. सदर प्रक्रिया भ्रष्टाचाररहित, मानव हस्तक्षेपरहित आहे. त्यामुळे अन्याय झालेल्या शिक्षकांना सदर बदल्या प्रक्रिया न्याय देणारी आहे. ही प्रक्रिया राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असताना काही संधीसाधू शिक्षक बदल्या होऊ नये, यासाठी प्रयत्न करीत आहेत. शासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता बदल्यांची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष मुकेश बन्सोड, वैशाली मडावी, जगदिश नाकतोडे, न.पा. परशुरामकर, राजेश रोकडे, प्रभुजी वैद्य, चेतन दोनाडकर, दिगांबर उईके, अखिलेश करंबे, चंद्रकांत सहारे, योगेश ढोरे, सिध्दार्थ सहारे, विठ्ठल दहिकर, मनोज रोकडे, शत्रुघ्न दांडवे, परशुराम प्रधान, गजानन पिपरे, शंकर झाडे, किशोर बावणे, चंदू रामटेके, पुरूषोत्तम सयाम, भाष्कर कन्नाके, मिन्नाथ नखाते, प्रशांत कुडकलवार, कोपेश कुमरे, जयदेव बन्सोड, रोशनी धाते, अनिता पिलारे, अनुपमा आखाडे, साधना कोटरंगे, छाया काटकाते, रेखा चौधरी, रवी जांभुळकर, पुनम लंजे, सुजाता सहारे, लिना चांदेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.एटापल्ली येथील तहसीलदारांना निवेदन देतेवेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष चित्रगुप्त अहीर, उपाध्यक्ष बाबुराव बानकर, सरचिटणीस जगदिश कळाम, कार्याध्यक्ष प्रशांत ठेंगरे उपस्थित होते.
शिक्षक बदल्यांची प्रक्रिया राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 1:35 AM
आॅनलाईन शिक्षक बदली प्रक्रियेला वेग देऊन बदली प्रक्रिया कोणाच्याही दबावाखाली न येता राबवावी, अशी मागणी दुर्गम भाग शिक्षक संघटना तालुका शाखा कोरची, एटापल्लीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरची व एटापल्लीचे तहसीलदार यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
ठळक मुद्देबदली प्रक्रियेचे केले समर्थन : एटापल्ली व कोरची येथील शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन