शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

अवैध खनन व वाहतुकीतून ९३ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2017 1:32 AM

जिल्हाभरातील महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एप्रिल ते ३१ मार्च २०१७ अखेरपर्यंत वर्षभराच्या कालावधीत

चालू वर्षातही कारवाई सुरू : १ हजार १०१ प्रकरणे वर्षभरात निकाली लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्हाभरातील महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एप्रिल ते ३१ मार्च २०१७ अखेरपर्यंत वर्षभराच्या कालावधीत गौण खनिजाच्या अवैध खनन व वाहतुकीबाबत धाडसत्र राबवून संबंधित गौण खनिज तस्करांकडून एकूण ९३ लाख ५८ हजार ८७६ रूपयांचा दंड वसूल केला. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्षभरात गौण खनिजाच्या अवैध खनन व वाहतुकीबाबत एकूण १ हजार १०१ प्रकरणे निकाली काढली. जिल्ह्यातील रेतीघाटावरून शासनाच्या नियमानुसार रेती व इतर गौण खनिजाचे खनन व वाहतूक होणे आवश्यक आहे. याबाबत महसूल विभाग व जिल्हा खनिकर्म विभाग नियंत्रण ठेवत असते. गडचिरोली जिल्ह्यातील रेतीघाटाची आॅनलाईन लिलाव प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालय अधिनस्त असलेल्या जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने दरवर्षी राबविल्या जाते. घाटाची विक्री झाल्यानंतर संबंधित कंत्राटदारांना त्या घाटातून रेतीचे खनन व वाहतूक करण्याचा परवाना दिला जातो. मात्र शासनाचे नियम असतानासुद्धा जिल्ह्यातील काही कंत्राटदार क्षमतेपेक्षा अधिक व जास्तीच्या क्षेत्रात रेतीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करतात. काही कंत्राटदार टीपीपेक्षा अधिक रेती व इतर गौण खनिजाचे खनन व वाहतूक करतात. या अवैध खनन व वाहतुकीला पायबंद घालण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक गठित करण्यात आले आहे. महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गडचिरोली उपविभागात गेल्या वर्षभरात १७२ प्रकरणे निकाली काढून या प्रकरणातून संबंधित कंत्राटदाराकडून १९ लाख १४ हजार ६४० रूपयांचा दंड वसूल केला. या उपविभागात गडचिरोली व धानोरा तालुक्याचा समावेश आहे. चामोर्शी व मुलचेरा तालुक्याचा समावेश असलेल्या चामोर्शी उपविभागात महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सन २०१६-१७ या वर्षभरात धाडसत्र राबवून एकूण १७८ प्रकरणे निकाली काढली. या प्रकरणातून संबंधित कंत्राटदाराकडून १३ लाख ९२ हजार ५० रूपयांचा दंड वसूल केला. देसाईगंज व आरमोरी तालुक्याचा समावेश असलेल्या कुरखेडा उपविभागातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वर्षभरात ४७० प्रकरणे निकाली काढून एकूण १७ लाख ३८ हजार ७२० रूपयांचा दंड वसूल केला. कुरखेडा व कोरची तालुक्याचा समावेश असलेल्या कुरखेडा उपविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवैध खनन व वाहतुकीबाबतचे १०९ प्रकरणे निकाली काढून एकूण ७ लाख ३ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला. अहेरी व सिरोंचा तालुक्याचा समावेश असलेल्या अहेरी उपविभागात अवैध खनन व वाहतुकीबाबत एकूण १३४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून ३३ लाख ३४ हजार ५६६ रूपयांचा दंड संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करण्यात आला. एटापल्ली व भामरागड तालुक्याचा समावेश असलेल्या एटापल्ली उपविभागाच्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वर्षभरात धाडसत्र राबवून गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीबाबत एकूण ३८ प्रकरणे निकाली काढली व कंत्राटदाराकडून २ लाख ७५ हजार ४०० रूपयांचा दंड वर्षभरात वसूल केला आहे. अहेरी उपविभाग कारवाईत आघाडीवर गडचिरोली जिल्ह्याच्या बहुतांश भागात रेती व इतर गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करण्याचा प्रकार प्रचंड वाढला आहे. रेती व इतर गौण खनिजाची तस्करी करून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी अनेक कंत्राटदार व तस्कर प्रयत्न करतात. गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात धाडसत्र राबवून सर्वाधिक दंड वसूल करण्याच्या कामात अहेरी उपविभाग आघाडीवर आहे. अहेरी तालुक्यातील महसूल विभागाने ३६ प्रकरणे निकाली काढून ३ लाख ८८ हजार ८०० तर सिरोंचा तालुक्यातील महसूल विभागाने ९८ प्रकरणे निकाली काढून २९ लाख ४५ हजार ७६६ रूपयांचा दंड वसूल केला. अहेरी उपविभागाने सर्वाधिक ३३ लाख ३४ हजार ५६६ रूपयांचा दंड वसूल केला. अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीच्या कारवाईत इतर उपविभाग माघारले आहे. २०१७-१८ या चालू वर्षातही रेती तस्करांविरोधात कारवाई सुरू आहे. कारवाईने रेतीचे भाव वधारले महसूल विभागाच्या कारवाईमुळे चोरट्या मार्गाने उपलब्ध होणाऱ्या रेतीच्या वाहतुकीवर काही प्रमाणात नियंत्रण आले. परिणामी कंत्राटदारांनी रेतीचे दर वाढविले आहे. सद्य:स्थितीत प्रती ब्रॉस २००० ते २५०० रूपये दराने रेतीची विक्री सुरू आहे. ग्रामीण भागात रेतीचा तुटवडा निर्माण झाला असल्याने इमारत व घर बांधकामे प्रभावित झाली आहेत.