शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

रेल्वेमार्गासाठी अवैध मुरूम उत्खनन, कंत्राटदार कंपनीला २३५ कोटींचा दंड

By संजय तिपाले | Published: June 17, 2024 6:02 PM

'लोकमत'च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग: जिल्हा भरारी पथकाची कारवाई

गडचिरोली  -  रेल्वे मार्गाच्या भराव्याकरिता अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी जिल्हा भरारी पथकाच्या सनियंत्रणात मागील तीन दिवसापासून  मोठ्या क्षेत्राची तांत्रिक मोजणीची कार्यवाही  सुरू होती. आज ती पूर्ण झाली असून  संबंधित जेपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीस  तब्बल २ लाख ७३ हजार ३५१ ब्रास अवैध उत्खननाकरिता २३५ कोटी ८ लाख १८ हजार ६०० रुपये दंडाची रक्कम का आकारणी करू नये, याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. 'लोकमत'ने गौण खनिज लुटीचा पर्दाफाश केला होता, त्यानंतर प्रशासनाला जाग आली.

चार दिवसांपूर्वी प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी गठीत केलेल्या विशेष जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख तहसीलदार संजय पवार यांच्या निगराणीखाली ही कारवाई केली गेली. प्रभारी तहसीलदार हेमंत मोहरे यांनी दंड आकारणीच्या नोटीस बजावल्या . सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय भांडारकर, कनिष्ठ अभियंता श इंदुरकर, शाखा अभियंता अभिजीत शिनगारे, भूमी अभिलेखचे अभिलेखापाल व्ही. एल. सांगळे व त्यांच्या चमूने अवैध उत्खननाची तांत्रिक मोजणी करून तहसीलदार  गडचिरोली यांच्याकडे  अहवाल सादर केला त्यानुसार पाचपट दंड आकारणी करण्यात आली आहे.

अहवालानुसार खरपुंडी येथे सर्व्हे क्रमांक ५३/२/अ आणि ५४ मध्ये १३ हजार २५७ ब्रास मुरूम उत्खननाकरिता ११ कोटी ४० लाख १० हजार २०० रुपये,  लांजेडा स.क्र. १४/२६ आणि २४० मध्ये ९ हजार ६९९ ब्रास करिता ८ कोटी ३४ लाख११ हजार ४०० रुपये, माडेतुकूम स.क्र.१८ मध्ये १८ हजार ३५८ ब्रास करिता १५ कोटी ७८लाख ७८ हजार ८०० रुपये, गोगाव स.क्र.१८ मध्ये २० हजार ७७५ ब्रास करिता १७ कोटी ८६ लाख ६५ हजार रुपये, अडपल्ली स.क्र.१८ मध्ये ५० हजार १७६ ब्रास करिता ४३ कोटी १५ लाख१३ हजार ६०० रुपये, काटली स.क्र. १४५ आणि २७९मध्ये ५४ हजार ५७५ ब्रास करिता ४६ कोटी ९३ लाख ४५ हजार रुपये, मोहझरी स.क्र. २५, ३२,२१,९व १५ मध्ये ६२ हजार ६१७ ब्रास करिता ५३ कोटी ८५ लाख ६ हजार २०० रुपये आणि साखरा येथे स.क्र. १०२ व १५२ मध्ये ४३ हजार ८९४ ब्रास करिता ३७ कोटी ७४ लाख ८८ हजार ४०० रुपये असे एकूण २ लाख ७३ हजार ३५१  ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी २३५ कोटी ८ लाख १८ हजार ६०० रुपये दंडाची गणना करण्यात आली आहे.  

जिल्हाधिकारी रजेवर अन् कारवाईला मुहूर्त याविषयी  तीन दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे बेकायदेशररित्या मुरुम उत्खनन करणाऱ्या कंपनीला दणका बसला आहे. दरम्यान, या कंपनीला आतापर्यंत प्रशासनात कोण पाठीशी घालत होते, अशी चर्चा सुरू आहे. जिल्हाधिकारी संजय दैने रजेवर गेल्यानंतर प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या कार्यकाळात कारवाईला मुहूर्त मिळाला. या योगायोगाची देखील प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे.