शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आरोग्य सेवेत दुर्गम गडचिरोलीचा राज्यात दबदबा, सलग दुसऱ्या वर्षी अव्वलस्थान

By संजय तिपाले | Published: September 19, 2023 4:20 PM

वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाच्या कार्यप्रणालीत सुलभता व एकसूत्रता आणण्यासाठी आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीचा (एचएमआयएस) वापर केला जातो.

गडचिरोली: पायाभूत सुविधांचा अभाव, दुर्गम, अतिदुर्गम, डोंगरपाड्यांवर दळणवळणाची अपुरी साधने असताना खडतर प्रवास करत आरोग्यसेवा पुरविण्यात येथील यंत्रणेला यश आले. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी गडचिरोली जिल्ह्याने आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीच्या (एचएमआयएस) गुणांकनात १०० पैकी ९२ गुण घेऊन राज्यात अव्वलस्थान पटकावले. जिल्ह्यासाठी ही मोठी अभिमानास्पद बाब मानली जात आहे.

वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाच्या कार्यप्रणालीत सुलभता व एकसूत्रता आणण्यासाठी आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीचा (एचएमआयएस) वापर केला जातो. यामध्ये आरोग्य विभागाकडून केले जाणारे लसीकरण, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया, तपासणी, उपचार,  गरोदर माता व नवजात बालकांची तपासणी, उपचार, प्रसूती आदी विविध सेवांची नोंद केली जाते. विविध आरोग्यसेवांच्या प्रत्यक्ष कामानुसार गुणांकन केले जाते. या प्रणालीचे अंतिम गुणांकन १९ सप्टेंबरला जाहीर झाले. यात गडचिरोलीने २०२२- २३ मध्ये अव्वल क्रमांक मिळवला. यापूर्वी २०२१- २२ मध्येही प्रथम स्थान पटकावले होते. यंदा गडचिरोलीनंतर पुणे जिल्ह्याने ९१ गुणांसह द्वितीय तर परभणीने ८९ गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला. यवतमाळ चौथ्या स्थानी असून ८८ गुण मिळाले आहेत. 

गडचिरोलीत खडतर परिस्थितीत आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या विविध सेवांची ही पावती आहे. राज्यात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम स्थान मिळाल्याचा अभिमान आहे. शेवटच्या स्तरावर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचाही या यशात मोलाचा वाटा आहे. अधिक दर्जेदार व उत्तम सेवा देण्यासाठी तत्पर आहोत.- डॉ.दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली...

पायाभूत सुविधांचे हवे बुस्टरजिल्ह्याने आरोग्य सेवेत एकीकडे राज्यात प्रथम स्थान पटकावले असले तरी भामरागड, सिरोंचा यांसारख्या दुर्गम तालुक्यांत अद्यापही पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना कावड करुन किंवा झोळीतून दवाखान्यात नेले जाते तर कधी मृतदेह दुचाकीला बांधून न्यावा लागतो. त्यामुळे आरोग्यसेवा अधिक सुलभपणे देता याव्यात यासाठी रुग्णवाहिका, पक्के रस्तेे, मुबलक मनुष्यबळ, दर्जेदार सुविधा मिळणे गरजेचे आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली