प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार अनमोल कांबळे, मुक्तिपथ अभियानाचे उपसंचालक संतोष सावळकर,वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन विभुते, डॉ. सचिन वानखेडे, रामलू सडमेक, वामन उईके, जोगा उसेंडी, निर्मला सडमेक, ईश्वर पर्सलवार, मुक्तिपथचे केशव चव्हाण, तालुका प्रेरक आबिद शेख, युवराज दाभाडे उपस्थित होते. मुक्तिपथ अभियानातर्फे दुर्गम अशा तालुक्यात व्यसन उपचार क्लिनिकची सुविधा उपलब्ध झाली आहे. दारू पिणे हे आदिवासी संस्कृतीत नसून जास्तीत जास्त रुग्णांनी या क्लिनिकचा लाभ घेऊन दारूमुक्त व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सीताराम मडावी यांनी केले. दुर्गम अशा भामरागड तालुक्यात मुक्तिपथ अभियानातर्फे महिन्यातील पहिल्या व तिसऱ्या बुधवारी क्लिनिक सुरू राहणार आहे. पहिल्याच दिवशी आयोजित क्लिनिकच्या माध्यमातून एकूण ११ रुग्णांनी उपचार घेत दारूमुक्त होण्याचा निर्णय घेतला. यावेळी साईनाथ मोहुर्ले यांनी रुग्णांचे समुपदेशन केले तर पूजा येल्लुरकर यांनी रुग्णांची माहिती घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष सावळकर यांनी केले.
===Photopath===
100621\10gad_2_10062021_30.jpg
===Caption===
उपचार क्लिनिकचे उद्घाटन करताना सीताराम मडावी, साेबत कार्यकर्ते.