शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सांस्कृतिक महोत्सवाचे थाटात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 6:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : सांस्कृतिक महोत्सवातून कलासंपन्न मानवी समाजाची निर्मिती होत असते. तसेही चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा ...

ठळक मुद्देकुलगुरू डॉ.कल्याणकर : सांस्कृतिक महोत्सवातून कलासंपन्न समाजाची निर्मिती होते

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सांस्कृतिक महोत्सवातून कलासंपन्न मानवी समाजाची निर्मिती होत असते. तसेही चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा या चार जिल्ह्याने झाडीपट्टी रंगभूमीच्या माध्यमातून आपला सांस्कृतिक वारसा जोपासला आहे. गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत शिक्षण घेत असलेले विद्याथी कुठेही मागे नाहीत. कलाकृती व अविष्कार त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरून आहे. विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करून आपला कलाविष्कार दाखवावा, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर यांनी केले.१७ वा आंतरविद्यापीठ सांस्कृतिक महोत्सव ‘इंद्रधनुष्य-२०१९’ च्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या हस्ते सोमवारी विद्यापीठाच्या प्रांगणात या महोत्सवाचे उद्घाटन झाले. विद्यापीठाच्या परिसरात प्रशस्त शामियानात झालेल्या या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.चंद्रशेखर भुसारी, राजभवन निरिक्षण समितीचे डॉ.सुनील पाटील, वित्त प्रबंधन समितीचे अध्यक्ष डॉ.एम. बी. पाटील, सदस्य डॉ.विजया पाटील, डॉ.ज्ञानोबा मुंडे, डॉ.वाणी लातुरकर, राजू हिवसे आणि विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले आदी मान्यवर मंचावर विराजमान होते.कुलगुरू डॉ.कल्याणकर यांनी गोंडवाना विद्यापीठ हे भौगोलिकदृष्ट्या वेगळ्या अवस्थेत असून अविकसीत आहे. त्यामुळे या विद्यापीठाला अजुनही हेल्पिंग हॅन्ड्सची गरज व्यक्त केली. कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे म्हणाले, गोंडवाना विद्यापीठ हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातूनच निर्माण झाले आहे. त्यामुळे या विद्यापीठाबद्दल माझ्यामध्ये पालकत्वाची भावना आहे. सदर विद्यापीठासाठी जे काही सहकार्य लागेल, ते आपण करू, असे ते म्हणाले.प्रास्ताविकात कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी विद्यापीठाच्या वाटचालीची आणि युवा महोत्सवाची पार्श्वभूमी सांगितली. संचालन प्रा.डॉ. नरेंद्र आरेकर यांनी तर आभार विद्यार्थी विकास विभागाच्या संचालिका तथा महोत्सवाच्या संयोजिका डॉ.प्रिया गेडाम यांनी मानले.कार्यक्रमाला विद्यापीठांतर्गत अधिसभा, विद्वत, व्यवस्थापन परिषदेसह सर्व प्राधिकरणाचे सदस्य तसेच विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, शिक्षण संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, तसेच शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.पहिले कुलगुरू आर्इंचवार यांचा गौरवया महोत्सवाच्या उद्घाटनानंतर गोंडवाना विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ.विजय आर्इंचवार यांचा कुलगुरू डॉ.एन. व्ही. कल्याणकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमापूर्वी सर्व विद्यापीठांच्या चमुंच्या सांस्कृतिक रॅलीने कॉम्प्लेक्स परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले.आज होणार या कलांचे सादरीकरणसोमवारी उद्घाटन सत्रानंतर दुपारी स्थळचित्र आणि लोकसंगीत वाद्य स्पर्धा झाल्या. मंगळवारी सकाळी ९.३० पासून सुगम संगीत (भारतीय), पोस्टर मेकिंग, नकला, भारतीय समूहगान, चिकटकला (कोलाज) आणि एकांकिका स्पर्धा होणार आहेत. या सर्व स्पर्धा वेगवेगळ्या ४ मंचांवर एकाचवेळी सुरू राहणार आहेत.

टॅग्स :universityविद्यापीठ