पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, मनीष कलवालिया यांच्या संकल्पनेतून, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दुर्गम भागातील नागरिकांना, विविध शासकीय कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. सर्व कामे एकाच ठिकाणी होऊन जनतेचा वेळ व पैसा वाचावा हा मुख्य उद्देश आहे. २० सातबारा, आठ ‘अ', ४ जात प्रमाणपत्र, २ अधिवास प्रमाणपत्र, ९ संजय गांधी निराधार,२ शेतकरी अपघात विमा योजना प्रस्ताव, ५० टक्के सवलतीने धान बीज वाटप नोंदणी करण्यात आली. या प्रसंगी ग्रामसेवक कृष्णा ऊईके, तलाठी नैताम, पाेलीस पाटील राकेश नागोसे, विलास चांभारे, ग्रा.पं.सदस्य सुरेखा वनस्कर, आरोग्य सेवक जी. डी. कोरे, आरोग्य सेविका व्ही.के. नंदेश्वर, प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलीस नारायण राठोड, प्रवीण जोगी सर्व अंमलदार व मालेवाडा परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
मालेवाडा येथे दादा लोरा खिडकीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:25 AM