पालकमंत्री उपस्थित : गडचिरोली न. प. च्या प्रांगणात ५ एप्रिलपर्यंत कार्यक्रम गडचिरोली : युवारंग फाऊन्डेशनच्या वतीने श्री राम नवमी युवा समितीकडून श्री राम जन्मोत्सव सोहळा २८ मार्च रोजी प्रारंभ झाला आहे. २८ मार्चला सायंकाळी ४ वाजता श्रीराम कलशयात्रा काढण्यात आली. त्यानंतर सायंकाळी सुंदरकांड घेण्यात आले. २९ मार्च रोजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. ‘माझे शहर, स्वच्छ शहर’ या विषयावरील या प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष योगीता भांडेकर, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, श्रीराम नवमी युवा समिती अध्यक्ष सुभाष उप्पलवार, उपाध्यक्ष रोशन आखाडे, सचिव गुड्डू कासर्लावार, सहसचिव हर्षल गेडाम, कोषाध्यक्ष सुमेध कावळे, सहकोषाध्यक्ष मंगेश मोहितकर, राहुल जुमनाके, स्वप्नील खांडरे, अक्षय बोदलकर, मुरारी तिवारी, नयन कहाळे, राकेश नैताम, अनिल तिडके, संतोष बोलुवार, संदीप लांजेवार, पराग पोरेड्डीवार, हेमंत राठी आदी उपस्थित होते. ३० मार्च रोजी भजन संध्या कार्यक्रम झाला. त्यानंतर शुक्रवारी गौ-पूजन व गौ-दान कार्यक्रम झाला. १ एप्रिल रोजी आरोग्य तपासणी कार्यक्रम होणार आहे. यावेळी रक्तदान कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला डॉ. यशवंत दुर्गे, डॉ. चेतन कोवे, डॉ. मिलींद रामटेके, डॉ. अनंता कुंभारे, डॉ. विवेक आत्राम, डॉ. लालाजी वट्टी आदींसह जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. शैलजा मैदमवार उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२ वाजता श्रीराम भूमी नगर परिषद प्रांगण येथे रक्तदानासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. २ एप्रिलला चिमुकल्यांसाठी चित्रकला स्पर्धा सकाळी ७ वाजता तर ३ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता सुगम संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. ४ एप्रिलला नगर भोजन व महाप्रसाद सायंकाळी ४ वाजतापासून सुरू होणार आहे. याच दिवशी गीत रामायण कार्यक्रम होणार असून ५ एप्रिलला श्रीराम जन्मोत्सव सोहळा व गोपालकाला दुपारी १२ वाजता नगर परिषदेच्या प्रांगणात होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता नगर परिषदेच्या प्रांगणात शोभायात्रा काढली जाणार असल्याची माहिती सुभाष उप्पलवार यांनी दिली आहे. (नगर प्रतिनिधी)
श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे उद्घाटन
By admin | Published: April 01, 2017 1:57 AM