वैरागडातील प्रशासकीय इमारत : निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याचा आरोप लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे तीन वर्षांपासून प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. या इमारतीचे अजूनपर्यंत उद्घाटन व हस्तांतरणही झाले नसताना ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. यावरून इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट होत आहे. गावातील सर्वच शासकीय कार्यालय एकाच ठिकाणी असावे व नागरिकांना सोयीचे व्हावे, यासाठी प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. वैरागड येथील इमारत मागील तीन वर्षांपासून बांधली जात आहे. मात्र अजूनपर्यंत बांधकाम पूर्ण झाले नाही. मुख्य इमारतीमधील काही खोल्यांमध्ये खिडक्या, पंखे लागले नाहीत. दर्शनी भागातील दोन खोल्यांचे काम पूर्ण झाले आहे. एका खोलीत तलाठी कार्यालय तर दुसऱ्या खोलीत सेतू केंद्र चालू आहे. प्रशासकीय इमारतीच्या बाजुला निवासस्थानांचे काम चालू आहे. या ठिकाणी शौचालय, बाथरूमसाठी लावलेल्या साहित्याची तोडफोड झाली आहे. भितींना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे इमारतीसाठी वापरलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट होत आहे. या कामाची चौकशी करून कंत्राटदारावर कारवाईची मागणी होत आहे.
उद्घाटनापूर्वीच इमारतीला तडे
By admin | Published: June 03, 2017 1:15 AM