कोमटी समाजाला उच्चभ्रू समाज म्हटले जाते, पण सध्याच्या काळात या समाजाची वाताहात झाली आहे. कित्येक कुटुंबांच्या घरात सुशिक्षित बेरोजगार मुले आहेत. रोजगार नाही, नाेकरी मिळत नाही, व्यवसाय करायचा म्हटल्यास मोठे भांडवल नाही, बँकाही कर्ज देत नाही. लहान सहान व्यवसाय लावून बसलेल्यांवर मंदीचे सावट आहे. श्रीमंत कुटुंबातील मुले मोठे व्यवसाय करतात, परंतु गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्यांची गोची होत आहे. दीड ते दोन वर्षांपासून कोरोनाकाळ सुरू आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे वय वाढत आहे, पण लग्न होणेही कठीण झाले आहे. कोणीही मुली द्यायला तयार नाही. एकंदरीत कोमटी समाजातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील बेरोजगार तरुणांचे ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी द्विधा मनःस्थिती झाली आहे. त्यामुळे आर्य वैश्य कोमटी समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी समाजबांधवांकडून केली जात आहे.
आर्य वैश्य (कोमटी) समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 4:37 AM