शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
6
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
7
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
8
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
10
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
11
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
12
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
13
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
14
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
15
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
16
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
17
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
18
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
19
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
20
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन

रेल्वे स्टेशनला दीड कोटीचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 11:20 PM

गोंदिया-बल्लारशहा रेल्वे मार्गावर असलेल्या देसाईगंज रेल्वेस्टेशनने २०१८ या वर्षभरात ९ लाख २५ हजार प्रवाशांची वाहतूक करीत १ कोटी ५४ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे.

ठळक मुद्देवर्षभरातील स्थिती : ९ लाख २५ हजार प्रवाशांनी केला देसाईगंज येथून पुढचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : गोंदिया-बल्लारशहा रेल्वे मार्गावर असलेल्या देसाईगंज रेल्वेस्टेशनने २०१८ या वर्षभरात ९ लाख २५ हजार प्रवाशांची वाहतूक करीत १ कोटी ५४ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे.देसाईगंज हे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्टेशन आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश रेल्वे प्रवाशी त्यांचा पुढील प्रवास देसाईगंज येथूनच करतात. मागील काही वर्षात या मार्गावरून धावणाऱ्या ट्रेनची संख्या सुध्दा वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. १७ एप्रिल १९९३ साली या रेल्वेलाईनला ब्रॉडगेजमध्ये परावर्तीत करण्यात आले. तेव्हापासून प्रवाशी व ट्रेनची संख्या वाढली आहे. १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत देसाईगंज रेल्वेस्टेशनमधून एकूण ९ लाख २५ हजार २८० प्रवाशांनी प्रवास केला. या प्रवाशांकडून रेल्वेला १ कोटी ५४ लाख २६ हजार ११० रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्ग तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यास प्रवाशांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.सोयीसुविधांचा अभावकोट्यवधी रूपयांचे उत्पन्न जरी या रेल्वेस्थानकातून मिळत असले तरी रेल्वे प्रशासन मात्र प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. गोंदिया-बल्लारशहा दरम्यान दुसरी रेल्वेलाईन टाकण्याची मागणी माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांनी केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.