काहीतरी राेजगार असावा या उद्देशाने काही बेराेजगार युवकांनी सुमाे, स्काॅर्पीओ, झायलाे, बाेलेराे तसेच कार वर्गातील वाहने खरेदी करून व्यवसाय सुरू केला. बहुतांश जण चालक व मालक स्वत:च आहेत. ही सर्वच वाहने दहा लाख रूपयांपेक्षा अधिक किमतीची आहेत. अनेक वाहनांसाठी फायनानंस कंपन्यांकडून कर्ज काढण्यात आली आहेत. काेराेनामुळे मागील वर्षीही लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. पुन्हा दुसऱ्या लाटेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाने जिल्हाबंदी केली आहे. त्यामुळे लांब प्रवासासाठी वाहन भाड्याने घेणे बंद झाले आहे. तसेच लग्न व इतर समारंभांमध्ये नागरिकांच्या उपस्थितीवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. परिणामी ग्राहक मिळणे कठीण झाले आहे. मागील वर्षभरापासून उत्पन्न ठप्प पडले असल्याने कर्जाचे हप्ते कसे भरावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बाॅक्स
वाहने सुरू पण गॅरेज बंद
वाहन क्षमतेच्या निम्मे प्रवाशी बसवून प्रवास करण्यास शासनाने अनुमती दिली आहे. मात्र गॅरेज व ऑटाेमाेबाईलची दुकाने बंद आहेत. एखादेवेळी वाहनात बिघाड निर्माण झाल्यास दुरूस्ती करण्यास अडचण निर्माण हाेत आहेत. सामानही मिळत नसल्याने थाेडाफार जरी वाहनात बिघाड निर्माण झाल्यास ते घरीच ठेवावे लागत आहे. गॅरेज बंद असल्याने त्यांचाही राेजगार हिरावल्या गेला आहे.
बाॅक्स
वाहनचालकांसमाेर अडचणींचा डाेंगर
वाहन बंद राहिले तरी वाहनाची देखभाल व दुरूस्ती करावीच लागते. त्यामुळे वाहनाचा किमान खर्च सुरूच राहते. हा खर्च न केल्यास वाहन बंद पडण्याची शक्यता राहते. कर्ज काढून वाहन खरेदी केले आहे. कर्जाचे हप्ते लाखाेच्या घरात आहेत. हे हप्ते कसे भरावे असा प्रश्न वाहनमालकांसमाेर निर्माण झाला आहे. वाहनचालकांचा राेजगारही हिरावल्या गेला आहे.
प्रतिक्रिया
-वाहने पाॅईंटवर मात्र ग्राहक मिळेणा-
दिवसातून एखादा ग्राहक मिळेल या आशेने वाहने शहरातील कार पाॅईंटवर लावली जात आहेत. मात्र ग्राहकच मिळत नसल्याने आम्ही हतबल झालाे आहाेत. दुसऱ्या जिल्ह्यात साेडण्यासाठी ई-पास काढलेला एखादा व्यक्ती मिळते. लाॅकडाऊनमुळे वाहनांचा व्यवसाय जवळपास ठप्पच पडला आहे.
संदीप कांबळे, वाहन चालकमालक
कर्ज काढून वाहन खरेदी केले. वर्षभरापासून या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे वाहनांच्या कर्जाचे हप्ते कसे भरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. लाॅकडाऊनच्या कालावधीतील स्थिती लक्षात घेता कर्जावरील व्याज माफ करावे. तसेच कर्जाचे हप्ते भरण्याची मुदत वाढवून देण्याची गरज आहे.
प्रतिक्रिया
गॅरेजवाल्यांचे पाेट-पाणी बंद
मागील महिनाभरापासून गॅरेज बंद आहेत. दरराेज येणाऱ्या उत्पन्नातून संसाराचा प्रपंच सुरू हाेता. मात्र दुकानच बंद असल्याने राेजीराेटी थांबली आहे. मागील महिनाभरापासून आम्ही कसे जीवन जगत आहाेत. हे आम्हालाच माहीत.
सूरज रामटेके, गॅरेज मालक
वाहन हे अत्यावश्यक वस्तू झाली आहे. मंत्री, जिल्हाधिकारी व इतर सर्वसामान्य सर्वच नागरिक संचारबंदीतही वाहनाचा वापर करीत आहेत. वाहन बिघडल्यास त्यांचे कामकाजच ठप्प पडू शकते. गॅरजचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून ते सुरू करू देण्याची परवानगी आवश्यक हाेती.
सुरेश मडावी, गॅरेज मजूर