लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने बºयाच उपाययोजना केल्या जात आहेत. कोविड सेंटरसह विलगीकरण कक्षही निर्माण करण्यात आले आहे. मात्र गडचिरोली व भामरागड शहरातील संस्थात्मक विलगीकरण कक्षात आवश्यक सोयीसुविधांचा अभाव असल्याचे दिसून येत आहेत. तशी ओरड कर्मचारी व नागरिकांकडून होत आहे.मार्च महिन्याच्या अखेरीसपासून कोरोना संसर्गाची समस्या निर्माण झाली. सर्वप्रथम २२ मार्च रोजी देशपातळीवर जनता कर्फ्यू शासनाच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने कोरोनाविरूद्धची लढाई सुरू करण्यात आली. जिल्हा व राज्याच्या बाहेरून येणाऱ्या नागरिकांचे संस्थात्मक तसेच गृह विलगीकरण करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा, खासगी शाळा, आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा व वसतिगृह, शासकीय महाविद्यालय, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय व इतर शाळांमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले. १४ दिवस ठेवल्यानंतर कोरोनाचे लक्षण न आढळल्यावर त्यांना घरी पाठविले जात आहे.प्रशासनाच्या वतीने गडचिरोली शहरात चार संस्थात्मक विलगीकरण कक्ष ठेवण्यात आले आहे. यामध्ये चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालय, सेमाना मार्गावरील आदिवासी विकास विभागाची इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा, पोटेगाव मार्गावरील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह तसेच विसापूर मार्गावरील सहायक समाजकल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह आदींचा समावेश आहे.शासकीय विज्ञान महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात सद्य:स्थितीत ४५ नागरिक आहेत. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी महसूल कर्मचारी व शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. १५ दिवसांपूर्वी येथे कमी नागरिक विलगीकरण कक्षात होते. मात्र आता पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत असून लॉकडाऊन कठोर करण्यात आले आहे. त्यामुळे विलगीकरणात असलेल्या नागरिकांची संख्या वाढली आहे. परिणामी या कक्षात शौचालय व बाथरूमची कमतरता भासत आहे. येथील क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांना मास्क उपलब्ध करून देण्यात आले नाही. सॅनिटायझरचा तुटवडा आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप कक्षातील नागरिकांनी केला आहे.शहरातील चार विलगीकरण कक्षात आतापर्यंत २०० नागरिक राहिले आहेत. आपण प्रत्येकाला शौचालय देऊ शकत नाही. तेथील विलगीकरण कक्षातील नागरिकांना स्वत:कडील मास्क वापरावे, स्वच्छतेकडे आमचे लक्ष आहे. मात्र प्रशासनाला सहकार्य करावे, असे तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.भामरागडमध्ये कर्मचाऱ्यांसाठी सुविधा नाहीभामरागड येथे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय व आदिवासी विकास विभागाचे महिलांचे शासकीय वसतिगृह असे दोन विलगीकरण कक्ष ठेवण्यात आले आहे. या कक्षात सद्य:स्थितीत १७ नागरिक आहेत. विलगीकरण कक्षात असलेल्या नागरिकांवर देखरेख करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली आहे. सकाळी ६ ते दुपारी २ वाजता, दुपारी २ ते रात्री १० व रात्री १० ते सकाळी ६ वाजता अशा तीन पाळीमध्ये कर्मचारी तैनात असतात. मात्र या कक्षात कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र खोली देण्यात आली नाही. खुर्च्यांचीही येथे कमतरता आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. कर्मचाऱ्यांना झोपण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप येथील कर्मचाऱ्यांनी केला आहे. विलगीकरण कक्षात असलेल्या नागरिकांना मास्क उपलब्ध करून देण्यात आले नाही. तसेच सॅनिटायझर संपलेले आहे. नव्याने सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे कर्मचारी व नागरिकांना त्रास होत आहे.विलगीकरण कक्षात रात्रीपाळीतील कर्मचाºयांना कर्तव्य पार पाडायचे आहे. केवळ झोपण्यासाठी ड्यूटी लावली नाही. कर्मचाºयांचे आरोपात तथ्य नसून काम टाळण्याचा प्रकार दिसून येत आहे. येथे सोयीसुविधा पुरविल्या जात असून कर्मचाºयांनी जबाबदारीने काम करणे अपेक्षित आहे.- एस.एन.सिलमवार, तहसीलदार, भामरागड
संस्थात्मक विलगीकरण कक्षात असुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 5:00 AM
मार्च महिन्याच्या अखेरीसपासून कोरोना संसर्गाची समस्या निर्माण झाली. सर्वप्रथम २२ मार्च रोजी देशपातळीवर जनता कर्फ्यू शासनाच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने कोरोनाविरूद्धची लढाई सुरू करण्यात आली. जिल्हा व राज्याच्या बाहेरून येणाऱ्या नागरिकांचे संस्थात्मक तसेच गृह विलगीकरण करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली.
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांसह नागरिकांची ओरड : स्थानिक प्रशासनाचे नियोजन ढासळले; स्वच्छतेच्या कामात दुर्लक्ष होत असल्याचा आरोप