लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत अंत्योदय, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना स्वस्त धान्याचे वितरण केले जाते. ही व्यवस्था सुरळीत सुरू असली, तरी जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यास येथे सरकारी दुकानांची संख्या कमी आहे. आता जिल्ह्यात १६८ नवीन शासकीय दुकाने सुरू होणार आहेत. यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने कार्यवाही सुरू केली आहे.
जिल्ह्यात १ हजार ८०० हून अधिक महसुली गावे आहेत. या गावांसाठी १ हजार १९६ स्वस्त धान्य दुकाने सुरू आहेत. सुमारे ३ ते ४ गावे मिळून धान्य दिले जाते. ज्या गावात दुकाने मंजूर नाहीत. तेथील नागरिक पायी प्रवास करून इतर गावी पोहोचून धान्य खरेदी करतात. पावसाळ्याच्या दिवसात केवळ सरकारी रेशन खरेदी केल्याने लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. जिल्ह्यातील दुर्गम भागातील बहुतांश नदी-नाल्यांवर पुलाचे बांधकाम झालेले नाही. परिणामी, ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन दुकान गाठावे लागते. गेल्या अनेक दशकांपासून ही स्थिती कायम आहे. ही समस्या लक्षात घेऊन वाढीव दुकाने सुरू केली जाणार आहेत.
कोणाला मिळणार प्राधान्य ?नवीन स्वस्त धान्य दुकानांसाठी महिला बचत गट किंवा पुरुष बचत गटाला अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. प्रशासकीय स्तरावर दुकानांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एका दुकानासाठी अनेक बचत गटांनी अर्ज केले असल्याची माहिती आहे.
पीओएस मशीनमध्ये वारंवार तांत्रिक बिघाडरेशन वाटपासाठी दुकानमालकांना पीओएस मशीन देण्यात आलेल्या आहेत. मात्र, या मशीनमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड येत असल्याने रेशन वाटपाच्या कामात दुकानदारांना अडचणी येत आहेत. सदर मशीन अपडेट करणे आवश्यक आहे. तेव्हाच लाभार्थ्यांसह दुकानदारांनाही त्रास होणार नाही.
बंद दुकानांचे हस्तांतरण केव्हा ?जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अनेक दुकाने बऱ्याच वर्षापासून बंद आहेत. अशा दुकानांची मालकी हस्तांतरित करणे गरजेचे आहे. शासकीय नियमानुसार, बंद दुकानाचे हस्तांतरण तीन महिन्यांच्या कालावधीत करणे आवश्यक आहे. असे असतानाही जिल्ह्यातील शेकडो बंद दुकानांचे हस्तांतरण झालेले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना स्वस्त धान्य वेळेवर मिळत नाही.
अशी आहे स्वस्त धान्य दुकानांची स्थितीतालुका एकूण दुकाने प्रस्तावित दुकानेगडचिरोली १०८ १८आरमोरी ९५ २२देसाईगंज ६४ ००कुरखेडा ९८ ००कोरची ५६ ०८धानोरा १२६ ३०चामोर्शी १९८ १८मुलचेरा ६३ ०५अहेरी १२० २०एटापल्ली ११५ २०भामरागड १४९ १३सिरोंचा १०४ ००एकूण ११९६ १६८