लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी कृषी विभागामार्फत केली जाते. सदर योजनांची पुरेपूर माहिती घेऊन शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, जेणेकरून शेतीतील उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी केले.कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कृषी कल्याण अभियानांतर्गत चामोर्शी तालुक्याच्या फराडा येथे सोमवारी शेतकरी प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाला आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ पुष्पक बोथीकर, डॉ. विक्रम कदम, ज्ञानेश्वर ताथोड, चामोर्शीचे तालुका कृषी अधिकारी राजपूत, ए. एच. पिसारे, डॉ. ए. ई. तळेकर, डी. आर. सरकार, आत्मा विभागाचे हेमंत उंदीरवाडे, फराडाच्या सरपंच बेबी चौधरी, पोलीस पाटील शोभा राऊत, ग्रा. पं. सदस्य जयश्री भसारकर, शेतकरी गिरीधर उंदीरवाडे, ज्ञानेश्वर हजारे, आशिष म्हशाखेत्री उपस्थित होते.यावेळी डॉ. प्रकाश पवार यांनी शेतकऱ्यांनी मृदा परीक्षण करून घ्यावे व आवश्यकतेनुसार खताची मात्रा देण्याचे आवाहन केले. शेतीस जोड व्यवसाय म्हणून भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन व अळींबी व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले. आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी अतिरिक्त दुधाचे मूल्यवर्धन करून विक्री करण्याबाबत सांगितले. याप्रसंगी प्रीती हिरडकर, ज्ञानेश्वर ताथोड, पुष्पक बोथीकर यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमादरम्यान जनावरांचे पावसाळापूर्व प्रतिबंधात्मक लसीकरण करून कृत्रिम रेतनाची माहिती देण्यात आली.
योजनांच्या लाभातून कृषी उत्पादन वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 1:11 AM
शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी कृषी विभागामार्फत केली जाते. सदर योजनांची पुरेपूर माहिती घेऊन शेतकºयांनी लाभ घ्यावा, जेणेकरून शेतीतील उत्पादन वाढून शेतकºयांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी केले.
ठळक मुद्देअनंत पोटे यांचे आवाहन : फराडा येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद