शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

जिल्ह्यात तेलवर्गीय भुईमूग, करडई पिकाच्या क्षेत्रात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2021 5:00 AM

रब्बी हंगाम सन २०१९-२२ मध्ये आरमोरी तालुक्यात रबी पिकाची पेरणी  ७ हजार ४९९ हेक्टर क्षेत्रात झाली असून, यात गहू, मका,  हरभरा, लाखोळी, कडधान्ये पिकातील मूग, उडीद, पोपट, चवळी, मोठ तसेच तेलवर्गीय बियाणात भुईमूग, करडई, जवस  याशिवाय भाजीपाला पिकात वांगी, टमाटर, कोबी, कारली, इतर भाजीपाल्याचे उत्पादन क्षेत्र वाढत आहे. 

प्रदीप बोडणेलाेकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आरमाेरी तालुक्यासह गडचिराेली जिल्ह्यात धान पट्ट्यात खरिपाचा हंगाम आटोपला आणि थंडीची चाहूल लागली की रब्बीच्या हंगामाला सुरुवात होते. हिवाळ्यातील दवबिंदू रबीच्या पिकाला अतिशय पोषक ठरतात. यंदा आरमोरी तालुक्यात तेलवर्गीय पिकात भुईमूग, करडईच्या पिकाचे क्षेत्र वाढले असून, परंपरागतरीत्या लावणी जाणारी लाखोळी पिकाचे क्षेत्र मात्र घटले आहे.     रब्बी हंगाम सन २०१९-२२ मध्ये आरमोरी तालुक्यात रबी पिकाची पेरणी  ७ हजार ४९९ हेक्टर क्षेत्रात झाली असून, यात गहू, मका,  हरभरा, लाखोळी, कडधान्ये पिकातील मूग, उडीद, पोपट, चवळी, मोठ तसेच तेलवर्गीय बियाणात भुईमूग, करडई, जवस  याशिवाय भाजीपाला पिकात वांगी, टमाटर, कोबी, कारली, इतर भाजीपाल्याचे उत्पादन क्षेत्र वाढत आहे. वाढत्या तेलाच्या किमती लक्षात घेऊन या वर्षात शेतकऱ्यांनी तेलवर्गीय भुईमूग, करडई पिकात वाढ  केली असून, आरमोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात परंपरागतरीत्या घेतले जाणारे लाखोळी पिकाचे क्षेत्र मात्र यंदा घटले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा, आरमोरी, देसाईगंज तालुक्यातून वाहणाऱ्या खोब्रागडी, वैलोचना, गाढवी ,सती या नद्यांच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात भुईमूग पिकाचे उत्पादन घेतले जाते. पण भुईमूग पिकाची नवीन पद्धतीने शेती करावी यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व मिळणाऱ्या सोयी-सुविधांचा अभाव आहे. परिणामी उत्पादन क्षेत्र वाढले असले तरी उत्पादनात मात्र त्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत नाही. उन्हाळी धान पिकाचे क्षेत्र वाढले असल्याने रबी पिकाच्या क्षेत्रावर परिणाम झाला आहे. मिरची पिकाच्या क्षेत्रातदेखील वाढ झाली असून, टरबूज पिकाचे क्षेत्र मागील पाच-सहा वर्षांत दुपटीने वाढले आहे.गडचिराेली जिल्ह्यात लाखाेळी व चन्याच्या काेवळ्या व हिरव्या भाजीला माेठी मागणी आहे. ही संधी साधून येथील शेतकरी पहिल्या ताेड्याची लाखाेळीची भाजी ताेडून गडचिराेली शहराच्या बाजारपेठत विक्रीसाठी आणतात. धानासाेबतच काही शेतकरी बाेरूचीही शेती करीत असल्याचे दिसून येत आहे. 

रबीच्या पीक पेऱ्यात यंदा झाली वाढ-    धान उत्पादक गडचिराेली जिल्ह्यात धानासाेबतच अनेक शेतकरी आता खरीप व रबी हंगामात बऱ्याच शेतकऱ्यांनी बहू पीक पद्धतीकडे वळले आहेत. यावर्षी रबी पिकाच्या पेऱ्यात यंदा वाढ झाली आहे. अनेक शेतकऱ्यांकडे सिंचन विहीर, माेटारपंप आदी सुविधा झाल्याने जिल्ह्यातील  शेतकरी आता दुबार पिकाकडे वळले आहेत.-    गडचिराेली जिल्ह्यातील शेतकरी गेल्या चार-पाच वर्षांपासून एकापेक्षा अधिक पिके घेण्याकडे आपला कल वाढविला आहे. खरीप व रबी अशा दाेन्ही हंगामात अनेक शेतकरी पिके घेत आहेत. -    अधिकाधिक व बारमाही विविध पिकांचे उत्पादन घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी उपलब्ध सिंचन सुविधा व यांत्रिकीकरणाचा सदुपयाेग करीत आहेत. त्यातल्या त्यात कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ मार्गदर्शक व कृषी अधिकाऱ्यांचे वेळाेवळी मार्गदर्शन मिळत असल्याने शेतकरी आता कृषी व्यवसायात प्रगती करीत आहेत. 

 

टॅग्स :agricultureशेती