पाळीव जनावरांची देखभाल करणे शेतकऱ्यांना कठीण जात होते तसेच जनावरांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांना बैलजोडी वापरणे कठीण झाले आहे. त्यामुळे बैलजोडीऐवजी शेतकरी ट्रॅक्टर खरेदीकडे वळले आहेत. ट्रॅक्टरला गावात हंगामी स्वरूपात रोजगार मिळू लागल्याने आजच्या घडीला साधारण गावातसुद्धा दहा-बारा ट्रॅक्टर सहज दिसून येतात. त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतातील नांगरणी, वखरणी, चिखलणी आदी कामे ट्रॅक्टरने केली जातात. वाढत्या डिझेलच्या किमतीमुळे ट्रॅक्टर भाडे ८०० रुपये प्रतितासांवर गेले आहे. त्यामुळे रोवणी खर्चाची बचत करून धान पिकांचे उत्पादन घेता येते, अशी खूणगाठ बांधून तालुक्यातील शेतकरी आवत्या पद्धतीने धान पिकाची लागवड करीत आहेत.
बॉक्स
शेतातील तण नष्ट करण्यासाठी धडपड
मृगाचा पाऊस आल्याने शेतशिवार हिरवेगार आहे. शेतातील तणाचा नायनाट करण्यासाठी शेतकरी तणनाशकांचा वापर करीत आहे. जेव्हा शेतकरी जनावरे पाळत होता, तेव्हा जनावरांच्या हिरव्या वैरणाची सोय शेतातील तणामधून पूर्ण व्हायची; मात्र आता अत्यल्प जनावरे असल्याने तणनाशके फवारणी करून शेत तणमुक्त केले जात आहे.
बॉक्स
शेतमजुरांची अडचण
शेतात धान पिकाची रोवणी करण्यासाठी शेतकरी गावातील शेतमजूर पाहत असत. पूर्वी आठवडा पद्धतीने धानाच्या स्वरूपात मोबदला देऊन मजूर ठेवले जायचे; मात्र यात बदल झाला असून, रोवणी काम आता ठेका पद्धतीने मजूर करू लागले आहेत. रोवणी हंगाम किमान महिनाभर चालताे. यातूनच एक मजूर साधारणतः दहा हजार रुपये सहज कमविताे. मात्र आवत्या पद्धतीमुळे रोवणी क्षेत्र कमी झाल्याने शेतमजुरांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
040721\img-20210704-wa0116.jpg
यावर्षी टाकण्यात आलेला धानाच्या आवत्या फोटो