घारगाव जवळील नाल्यावर उंच पूल बांधा
भेंडाळा : तालुक्यातील भेंडाळा परिसरात असलेल्या घारगावजवळील नाल्यावर कमी उंचीचे पूल असल्याने पावसाळ्यात पुरामुळे रहदारी बाधित हाेते. त्यामुळे या ठिकाणी उंच पूल बांधावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
घारगावजवळील नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात अनेक अडचणी येतात. या भागात रहदारीची समस्या आहे. त्यामुळे हरणघाट, घारगाव, रामाळा, फराडा, व मार्कंडादेव असा ८ किलोमीटरचा प्रस्तावित राज्यमार्ग मंजूर करून या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी जि. प. सदस्या कविता भगत यांनी ना. विजय वडेट्टीवार यांना निवेदन देऊन, पूल व रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. नाल्याशेजारी असलेल्या शेतजमिनीत पाणी साचून पिके सडतात. याशिवाय बरेच भाविक मार्कंडादेव येथे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे घारगावजवळील नाल्यावर उंच पुलाचे बांधकाम करावे, तसेच रस्त्याचे मजबुतीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
180721\0649img-20210718-wa0118.jpg
ठेंगणा असलेला पूल