उज्ज्वला गॅस याेजनेंतर्गत एलपीजी सिलिंडर प्रत्येक घरी पाेहाेचला आहे. उज्ज्वला याेजना ज्या वेळी राबविली जात हाेती त्या वेळी सिलिंडर केवळ ४०० ते ५०० रुपयांमध्ये उपलब्ध हाेत हाेता. त्यामुळे स्वयंपाकासाठी एलपीजी गॅसचा वापर करणे आपल्याला शक्य आहे, असा अंदाज बांधून लाभार्थ्यांनी गॅस सिलिंडरची उचल केली. याेजना बंद हाेताच एलपीजी गॅसचे भाव गगणाला भिडण्यास सुरुवात झाली. प्रत्येक महिन्याला २५ ते ५० रुपयांची वाढ हाेत हाेती. नाेव्हेंबर २०२० मध्ये गडचिराेली जिल्ह्यात एलपीजी सिलिंडर केवळ ६५० रुपयांमध्ये उपलब्ध हाेत हाेता. दर महिन्याला भाववाढ हाेऊन आता हे दर ९०० रुपयांच्या जवळपास पाेहाेचले आहेत. एवढा महागडा सिलिंडर वापर करणे अशक्य झाले आहे.
काेट.....
गॅस स्वस्त असल्याकारणाने स्वयंपाक करण्याबराेबरच पाणी गरम करण्यासाठी गॅस गिजर खरेदी केले. आता मात्र गॅसचे भाव दुप्पट झाले आहेत. त्यामुळे गॅस गिजरचा वापर बंद करण्यात आला आहे.
- संगीता कुळमेथे, गृहिणी
काेट....
गॅस ही जीवनावश्यक वस्तू बनली आहे. शहरामध्ये स्वयंपाकासाठी गॅसचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही. मात्र गॅसचे दर शासनाने अवाढव्य वाढविले आहेत. सबसिडीसुद्धा कमी झाल्याने गरीब कुटुंब अडचणीत आले आहे.
- सुमित्रा गजापुरे, गृहिणी
काेट...
उज्ज्वला याेजनेंतर्गत गॅस खरेदी केला. आता मात्र ९०० रुपयांवर सिलिंडर पाेहाेचला आहे. एवढी किंमत देऊन गॅस खरेदी करणे आता शक्य नसल्याने घरचा सिलिंडर रिकामाच पडून आहे. चुलीवर स्वयंपाक सुरू आहे.
- सुरेखा सूर्यवंशी
बाॅक्स
उज्ज्वला याेजनेचे सिलिंडर रिकामेच पडून
उज्ज्वला गॅस याेजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला गॅसचे वितरण करण्यात आले. गॅस व सिलिंडर सबसिडीवर मिळत असल्याने दुर्गम भागातील कुटुंबांनीही सिलिंडर खरेदी केले. आता भाववाढ झाल्याने हे सिलिंडर घरीच रिकामे पडून आहेत.
दर
नाेव्हेंबर २०२० - ६५०
डिसेंबर २०२० - ६९४
जानेवारी २०२१ - ७४४
फेब्रुवारी २०२१ - ८१९
मार्च २०२१ - ८७५
एप्रिल २०२१ - ८५७