कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आढावा बैठकीत कामगारांना कामावर घेण्यास तयार आहोत असे कबूल करण्यात आले हाेते. तसेच कामगार आयुक्तांनी कामगारांना कामावर घेण्याचे आदेशही दिले हाेते. परंतु मुख्याधिकारी यांनी आदेशाची पायमल्ली केली. त्यामुळे मुख्याधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी. तसेच अन्यायग्रस्त कामगारांना कामावर घेण्याचे आदेश देऊन कंत्राटदाराच्या चुकीने ४ महिने कामाशिवाय कामगारांना राहावे लागले. त्याची नुकसान भरपाई कंत्राटदार व मुख्याधिकारी यांच्याकडून वसूल करून कामगारांना द्यावी. शासकीय वाहने नगरपरिषदच्या मालकी हक्काच्या जागेत ठेवण्यात यावे, आदी मागण्यांसाठी प्रहारच्या वतीने अन्यायग्रस्त कामगारांना घेऊन बेमुदत उपोषण केले जाणार आहे. यासंदर्भात प्रहारचे तालुकाध्यक्ष निखिल धार्मिक यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
220821\img-20210821-wa0032.jpg
प्रहारचे आरमोरी तालुका अध्यक्ष निखिल धार्मिक हे अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना