शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
4
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
5
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
9
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
10
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
11
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
12
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
13
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
14
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
15
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
16
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
17
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
18
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
19
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
20
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!

स्वतंत्र अधीक्षिका, सुरक्षा रक्षक मिळणार

By admin | Published: August 05, 2014 11:25 PM

राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातील अनुदानित आश्रमशाळांमध्ये स्वतंत्र महिला अधीक्षिका व पहारेकरी/ सुरक्षा रक्षक पदाची नियुक्ती करण्यात आली नाही. कारण शासनाकडून या पद भरतीला

गडचिरोली : राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातील अनुदानित आश्रमशाळांमध्ये स्वतंत्र महिला अधीक्षिका व पहारेकरी/ सुरक्षा रक्षक पदाची नियुक्ती करण्यात आली नाही. कारण शासनाकडून या पद भरतीला मान्यता मिळाली नव्हती. मात्र आदिवासी विकास विभागाने २३ जानेवारी २०१४ रोजी नवा शासन निर्णय काढून या दोन्ही पदांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे या पदांच्या भरती प्रक्रियेबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच अनेक अनुदानित आश्रमशाळांनी महिला अधिक्षिका पद भरण्याच्या कारवाईला सुरूवात केली आहे. त्यामुळे आता प्रदीर्घ वर्षाच्या कालावधीनंतर जिल्ह्यातील एकूण १९ अनुदानित आश्रमशाळेत स्वतंत्र अधीक्षिका व सुरक्षा रक्षक मिळणार आहे. आदिवासी विकास विभागामार्फत राज्यभरात एकूण ५५२ शासकीय आश्रमशाळा सुरू आहे. यात १२८ प्राथमिक तसेच ४२४ माध्यमिक आश्रमशाळांचा समावेश आहे. याच विभागामार्फत इंग्रजी माध्यमांच्या पब्लीक स्कूलच्या धर्तीवर ५ व इंग्रजी माध्यमांच्या ६ आश्रमशाळा सुरू आहेत. तसेच राज्यभरात ५५६ अनुदानित आश्रमशाळा सुरू आहे. या आश्रमशाळा स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जात आहेत. यात ८९ प्राथमिक अनुदानित तर ४६७ माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांचा समावेश आहे. शासकीय आश्रमशाळेत गेल्या अनेक दिवसांपासून अधीक्षिका व सुरक्षा रक्षकाचे पद भरण्यात आले आहे. मात्र अनुदानित आश्रमशाळांमध्ये या पदांना मंजुरी मिळाली नसल्यामुळे या शाळांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आदिवासी विभागाने अनुदानित आश्रमशाळेतील या पदांना भरतीकरिता मंजुरी दिल्यामुळे अनुदानित आश्रमशाळांचा मार्ग मोकळा झाला आहे. अधीक्षिका पद हे वेतनश्रेणीवर तर सुरक्षारक्षकाचे पद केवळ ३२०० रूपये मानधनावर भरण्याबाबत शासन निर्णयात तरतूद आहे. (स्थानिक प्रतिनिधी)