लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: आजच्या भारत बंदला गडचिरोली जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. आलापल्ली येथे मोठ्या व्यापारी वर्गाने प्रतिसाद दिला नाही. काल सायंकाळी कांग्रेस तालुका अध्यक्ष मुश्ताक हकीम यांच्या नेतृत्वात कांग्रेसच्या कार्यकर्त्यांंनी बाजारपेठ बंदची सूचना दिली होती त्यानुसार आलापल्ली येथील छोटे व्यावसायिक चहा टपरी, तसेच छोटे हाटेल व्यावसायिक यांनी आपले व्यवसाय सकाळपासूनच बंद ठेवले होते. परंतु रोजच्या प्रमाणे सकाळी 9 वाजता मोठे किराणा व्यापारी, कापड दुकानदार यांनी आपले प्रतिष्ठान सुरु केल्याने गावातील सर्व छोटे मोठेव्यवसाय नियमित सुरु झाले. या बंदच्या निम्मिताने मात्र चहा, आणि छोटे व्यावसायिक यांची फसगत झाल्यासारखी झाली तसेच बस, शाळा, पेट्रोल पम्प आदी सुरूच होते.सिरोचात काहीच प्रतिसाद मिळाला नाही सर्व व्यवहार नेहमी प्रमाणे सुरू होते. कोरची शहरातील औषधांची दुकाने, दवाखाने, वाहतूक, बँका व ए.टी.एम., शासकीय कार्यालय वगळून बाकी सर्व प्रकारची दुकाने व कामे बंद ठेवून शेतकऱ्यांवर लादलेला काळा कायदा विरोधात बंदला समर्थन दिले आहे.
भारत बंद; गडचिरोली जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद; लहान दुकाने बंद, मोठी दुकाने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 3:24 PM