दशपर्णी अर्क पिकातील कीड व्यवस्थापनासाठी अत्यंत फायदेशीर असून याचा वापर शेतकऱ्यांनी केल्यास औषधी फवारणीच्या खर्चात बचत होते. दशपर्णी अर्क तयार करण्याची पध्दत अत्यंत सोपी असून शेतकरी सहजरित्या आपल्या घरी दशपर्णी अर्क तयार करू शकतात. याचा वापर शेतकऱ्यांना भाजीपाला पिकासह इतर पिकांच्या कीड नियंत्रणासाठी करावा, अशी माहिती आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महेंद्र दोनाडकर यांनी दिली. महेंद्र दोनाडकर यांनी देसाईगंज तालुक्यातील कृषी मित्रांमार्फत ॲझोला व दशपर्णी अर्क तयार करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
तुळशी येथे तालुका कृषी अधिकारी नीलेश गेडाम यांच्या मार्गदर्शनाखालील तालुका कृषी पर्यवेक्षक युगेश रणदिवे व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महेंद्र दोनाडकर यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी कृषिमित्र मेघनाथ दुनेदार, उपसरपंच सुरेश तोंडफोडे, उमाजी दुनेदार, हर्षवर्धन लोणारे, भाऊराव लोणारे, अण्णाजी मिसार, दिगांबर दुनेदार, मेघराज सुकारे व शेतकरी उपस्थित होते.
बाॅक्स
असा तयार करावा दशपर्णी अर्क...
दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी दहा प्रकारच्या वनस्पतीच्या पानांची व गोमूत्राची गरज असते. १०० लिटर पाण्यामध्ये हे अर्क तयार करण्यासाठी ५ लिटर गोमूत्र, ५ किलो कडुनिंब पाने, २ किलो सीताफळ पाने, २ किलो गऱ्हाडी पाने, २ किलो पपई पाने, २ किलो रुई पाने, २ किलो एरंडी पाने, २ किलो करंज पाने, २ किलो टनटनी (भूतगांजा) पाने, २ किलो सदाफुली पाने, २ किलो कटउंबर पाने या प्रमाणात घ्यावीत. २१ दिवसांनंतर १०० लिटर पाण्यापासून ७० ते ७५ लिटर दशपर्णी अर्क तयार होतो.
070721\img-20210706-wa0057.jpg
*तुळशी येथे शेतकऱ्यांना दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक !*