लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तुम्ही कोणत्याही कंपनीचा स्मार्ट फोन वापरत असाल तरी तुमच्या मोबाईलमधील माहिती, एवढेच नाही तर फेसबूक, व्हाट्स अॅपमधील संवाद, ई-मेल कोणालाही पाहणे शक्य आहे. त्याचा दुरूपयोग होण्याची शक्यता असल्यामुळे वेळीच सावध व्हा, असा सावधानतेचा इशारा माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ महेश रखेजा यांनी सोमवारी येथे एका कार्यशाळेत दिला.जिल्हा माहिती कार्यालय आणि पोलीस सायबर शाखेच्या वतीने पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात पोलीस आणि पत्रकारांसाठी ‘फेक न्यूज’वर कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात रखेजा यांनी माहिती तंत्रज्ञानातील अनेक आश्चर्यकारक गोष्टींचा उलगडा प्रात्यक्षिकासह करून दाखवला. समाज माध्यमातून फेक न्यूज (खोट्या बातम्या) कशा पसरविल्या जातात. त्यामागे कोणकोणती कारणे असतात. आपण अनभिज्ञपणे त्याला कसे बळी पडतो, त्यापासून वाचण्यासाठी काय करावे यावर राखेजा यांनी सखोल मार्गदर्शन केले. याचवेळी आपल्या नकळत आपल्या मोबाईलमधील माहिती कशी चोरली जाते याचेही त्यांनी उदाहरण दिले. त्याचा दुरूपयोग आतंकवादी कारवाया, राजकीय, धार्मिक आणि मार्केटिंगसाठी केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट करून सांगितले. त्यामुळे मोबाईलमध्ये पासवर्ड, एटीएम पीन यासारख्या गोष्टी न ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. याशिवाय कोणतेही चिनी कंपन्यांचे मोबाईल वापरणे जास्त धोकादायक असल्याचेही रखेजा म्हणाले.या कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रदीप चौगावकर, गडचिरोलीचे ठाणेदार दीपरतन गायकवाड, नक्षल सेलचे निरीक्षक संजय सांगळे व इतर अधिकारीगण प्रामुख्याने उपस्थित होते. आभार प्रदर्शन सायबर सेलचे निरीक्षक अजित राठोड यांनी केले.
तुमच्या स्मार्ट फोनमधील माहिती सुरक्षित नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 10:48 PM
तुम्ही कोणत्याही कंपनीचा स्मार्ट फोन वापरत असाल तरी तुमच्या मोबाईलमधील माहिती, एवढेच नाही तर फेसबूक, व्हाट्स अॅपमधील संवाद, ई-मेल कोणालाही पाहणे शक्य आहे. त्याचा दुरूपयोग होण्याची शक्यता असल्यामुळे वेळीच सावध व्हा, असा सावधानतेचा इशारा माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ महेश रखेजा यांनी सोमवारी येथे एका कार्यशाळेत दिला.
ठळक मुद्देआयटीतज्ज्ञ महेश रखेजा यांनी दिला सावधानतेचा इशारा