लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वैद्यकीय शिक्षणासाठी नियमानुसार ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक असताना तसेच शासन निर्णयात ओबीसींना २७ टक्के, एससी १५ टक्के व एसटी ७.५ टक्के आरक्षण नमूद असूनही आरक्षणाचे सर्व निकष तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला धुडकावून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने देशातील ओबीसींना केवळ १.७ टक्के आरक्षणानुसार ६९ जागा देत ओबीसी समाजावर अन्याय केला आहे.केंद्र व राज्य शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे, अन्यथा देशभर तीव्र आंदोलन छेडणार, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाने गडचिरोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांच्यामार्फत शासनाला निवेदनातून दिला आहे.देशातील १७७ वैद्यकीय महाविद्यालयातील ४ हजार ६४ जागांपैकी ओबीसींना २७ टक्के आरक्षणानुसार वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी १ हजार ९८ जागा आरक्षित असायला पाहिजे होत्या. मात्र प्रत्यक्षात ६९ जागा राखी ठेवत खुल्या प्रवर्गासाठी ३ हजार ८३ जागा म्हणजे ७६ टक्के आरक्षणानुसार देण्यात आल्या आहेत. यात ओबीसींच्या १ हजार २९ जागा खुल्या प्रवर्गात वळत्या करण्यात आल्या आहेत, असे म्हटले आहे. निवेदन देताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर, युवा महासंघाचे रूचित वांढरे, पंकज खोबे, निशिकांत नैताम, सुधांशू बुजाडे, देवीदास सोरते आदी उपस्थित होते.
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशात ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 12:36 AM
वैद्यकीय शिक्षणासाठी नियमानुसार ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक असताना तसेच शासन निर्णयात ओबीसींना २७ टक्के, एससी १५ टक्के व एसटी ७.५ टक्के आरक्षण नमूद असूनही आरक्षणाचे सर्व निकष तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला धुडकावून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने देशातील ओबीसींना केवळ १.७ टक्के आरक्षणानुसार ६९ जागा देत ओबीसी समाजावर अन्याय केला आहे.
ठळक मुद्दे१.६० टक्केच आरक्षण : ओबीसी महासंघाचा आंदोलनाचा इशारा