स्वस्त धान्य दुकानात भेटीदरम्यान पुरवठा निरीक्षक सचिन रामटेके व अव्वल कारकून सत्यनारायण येंबडवार उपस्थित होते. भेटीदरम्यान सर्व लाभार्थींना नियमानुसार नियमित व मोफत धान्य मिळत असल्याबाबत शहानिशा करण्यात आली. तसेच शिधापत्रिकाधारकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
लाॅकडाऊन काळात शासनाकडून विविध योजनांद्वारे कार्डधारकांना मोफत धान्याचे वितरण करण्यात येत आहे. त्याकरिता तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग अविरत कार्यरत आहे. संपूर्ण लॉकडाऊनदरम्यान धान्य वितरणाच्या कामात कोणताही खंड पडू दिला नाही. सर्व पात्र लाभार्थींनी शासनाच्या अन्नधान्याचा लाभ घ्यावा तसेच शिधापत्रिकेसह आधार नोंदणी व मोबाइल क्रमांक लिंक असल्याचे तपासून घ्यावे, असे आवाहन अहेरीच्या निरीक्षण अधिकारी अहेरी शिल्पा दरेकर यांनी केले आहे.