सत्र २०१६-१७ : सर्वाधिक चामोर्शी तालुक्यातील विद्यार्थी गडचिरोली : केंद्र शासनाच्या ११ व्या पंचवार्षिक योजनेपासून सुरू केलेल्या इन्स्पायर अवॉर्डसाठी सत्र २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील १५३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये चामोर्शी तालुक्यातील सर्वाधिक ४२ तर त्याखालोखाल गडचिरोली तालुक्यातील ३८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जुलै महिन्यात जिल्हास्तरीय प्रदर्शनी आयोजित करून इन्स्पायर अवॉर्ड प्रदान केला जाणार आहे. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात ज्या शाळांनी विद्यार्थ्यांचे आॅनलाईन नामांकन सादर केले. त्यापैकी केंद्र शासनाने १५३ विद्यार्थ्यांची निवड २०१६-१७ मधील प्रदर्शनासाठी केली आहे. त्यानुसार १५३ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी पाच हजार रूपये आरटीजीएस पध्दतीने जमा करण्यात आले आहेत. सदर रक्कम विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षकांच्या मदतीने नावीन्यपूर्ण प्रकल्प तयार करणे व जिल्हास्तरीय प्रदर्शनात भाग घेऊन खर्च करणे याकरिता दिली जाते. २०११-१२ ते २०१५-१६ या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांना अवॉर्ड रक्कम प्राप्त झाली नाही. अशांना प्रदर्शनीत रक्कम बँक खात्यात वटवून मिळणार आहे. (शहर प्रतिनिधी) निवडक प्रकल्प बंधनकारक शासनाच्या वतीने चालू वर्षाच्या विज्ञान प्रदर्शनीसाठी काही निवडक प्रकल्प बंधनकारक केले आहेत. यामध्ये मेक इन इंडिया थीमअंतर्गत न्यू कुल अँड टेक्निक्स फार मॅन्यूफॅक्चरिंग, न्यू टेक्नॉलॉजीस्, न्यू मटेरिअलस्, स्वच्छ भारत थीम अंतर्गत रिसायलिंग, हॉस्पिटल, इंडस्ट्रिअल, वेस्ट डिस्पोजल, क्लिन एनर्जी, रिडक्शन आॅफ पोल्युशन, ग्रीन टॉयलेट यासह आठ सबथीमचा समावेश आहे. स्वस्थ भारत थीम अंतर्गत चार सबथीम तसेच डिजीटल इंडिया थीम अंतर्गत डिजीटल एज्युकेशन, हेल्थ केअर, स्मार्ट सीटी, स्मार्ट विलेज यांचा समावेश आहे.
१५३ विद्यार्थ्यांना मिळणार इन्स्पायर अवॉर्ड
By admin | Published: July 15, 2016 1:48 AM