शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

बीडीओच्या निर्देशाला ग्रामसेवकाकडून वाटाण्याच्या अक्षता

By admin | Published: August 01, 2015 1:18 AM

तालुक्यातील मिरगुडवंचा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नारगुंडा येथील शाळेजवळ असलेल्या हातपंपासमोरील पाण्याचे डबके नष्ट करण्यासाठी पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी, ...

नागरिकांमध्ये रोष : नारगुंडात हातपंपासमोरचे डबके कायमभामरागड : तालुक्यातील मिरगुडवंचा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नारगुंडा येथील शाळेजवळ असलेल्या हातपंपासमोरील पाण्याचे डबके नष्ट करण्यासाठी पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश भामरागडचे संवर्ग विकास अधिकारी यांनी जनजागरण मेळाव्यात ग्रामसेवकांना दिले होते. मात्र ग्रामसेवकाने हा निर्देश पायदळी तुडवित कोणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आली आहे. नारगुंडा येथील गोटुलजवळ हातपंप आहे. हातपंपाचे सांडपाणी वाहून जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही. परिणामी हातपंपाचे पाणी जवळच्या खड्ड्यात साचून राहते. या खड्ड्यात दिवसभर डुकरांचा हैदोस राहते. गढुळ पाण्याची दुर्गंधी येत असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हेच सांडपाणी जमिनीत उतरून हातपंपाच्या माध्यमातून तेच पाणी प्यावे लागते. दहा वर्षांपूर्वी लालसू रामा पुंगाटी यांच्या घरासमोरील रस्त्याच्या बाजुला नालीचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र रस्त्यावर मुरूम टाकले नाही. त्याचबरोबर रस्तासुध्दा बनविण्यात आला नाही. कालांतराने नाली बुजून रस्ता दिसेनासा झाला. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद पडला आहे. परिणामी खड्ड्यामध्ये पाणी साचले आहे. पोलीस विभागाच्या मार्फतीने नारगुंडा येथे जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भामरागडचे संवर्ग विकास अधिकारीसुध्दा आले होते. गावातील नागरिकांनी या खड्ड्याबाबतची माहिती संवर्ग विकास अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर बीडीओंनी सदर खड्डा बुजवून सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश ग्रामसेवकाला दिले होते. मात्र याला वर्षाचा कालावधी उलटूनही ग्रामसेवकाने कोणतीही कार्यवाही केली नाही. परिणामी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी नारगुंडा येथील नागरिक बिरजू पुंगाटी, लालसू परसा, राजू पडालवार, झुरू गोटा, दलसू पुंगाटी, लालू पुंगाटी, दीपक परसा, रमेश पुंगाटी यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)