शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अपुऱ्या विशेष शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2017 1:37 AM

दिव्यांग विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे राहू नये यासाठी त्यांना विशिष्ट पद्धतीने शिकविण्यासाठी विशेष शाळांची निर्मिती करण्यात आली.

चार हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आबाळ लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : दिव्यांग विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे राहू नये यासाठी त्यांना विशिष्ट पद्धतीने शिकविण्यासाठी विशेष शाळांची निर्मिती करण्यात आली. जिल्हाभरात अशा १६ शाळा कार्यरत आहेत. त्यात ७२२ विद्यार्थी शिक्षण घेतात; मात्र गेल्या शैक्षणिक सत्रात केलेल्या पाहणीनुसार प्रत्यक्षात ४८४५ विद्यार्थी दिव्यांग आढळले आहेत. सर्वसाधारण विद्यार्थ्यांसोबत त्यांना शिक्षण घेणे कठीण जात असल्यामुळे त्यांच्यासाठी आणखी विशेष शाळांना मंजुरी देण्याची गरज निर्माण झाली आहे. सर्वशिक्षा अभियान समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) ६ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येत आहे. समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सन २०१६-१७ मध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १६ शाळांना मंजुरी दिली होती. त्यानुसार विविध उपक्रमही घेऊन गरजेनुसार त्या विद्यार्थ्यांना विविध साहित्याचेही वाटप करण्यात आले. विशेष उपक्रमांमध्ये साहित्य निश्चितीकरण व मोजमाप शिबिर, ब्रेल लिपीतील पाठ्यपुस्तके, लार्ज प्रिंट पाठ्यपुस्तकांचे वाटप, पालक प्रशिक्षण, परीक्षेत सोयी सवलती, परीक्षेमध्ये वाचक-लेखनिक, विशेष तज्ज्ञामार्फत शाळा स्तरावरील शिक्षकांना मार्गदर्शन, विशेष शिक्षकांमार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांना गृहमार्गदर्शन व शिक्षण, फिजिओथेरपी आदी सुविधा पुरविण्यात आल्या. यावर्षीही याच पद्धतीचे उपक्रम राबविले जातील. पण दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या पाहता त्यासाठी वाढीव निधी देऊन विशेष शाळांची संख्याही वाढविणे गरजेचे आहे. जिल्ह्यात आढळलेल्या ४८४५ दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये काही शारीरिक तर काही मानसिकदृष्ट्या कमकुवत आहेत. यात मानसिकरित्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी विशेष शाळांची संख्या आणखी वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. २२७ विद्यार्थ्यांना साहित्य वाटप गेल्या शैक्षणिक सत्रात २२७ दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यात ७० व्हिल चेअर, ७ तीन चाकी सायकल, २४ कॅलिपर, २ कुबड्या, २ एल्बो क्रॅचेस, १७ रोलेटर, २० श्रवण यंत्र, ६१ अल्पदृष्टी साहित्य, २ पांढरी काठी, २२ एमआर कीट आदी साहित्याचा समावेश होता. याशिवाय पूर्णत: अंध असणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचन व लेखनात येणारे अडथळे दूर करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी १५४ विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीतील पाठ्यपुस्तके आणि लार्ज प्रिंट पाठ्यपुस्तके देण्यात आली. त्यात गडचिरोली तालुक्यात १५, आरमोरी ८, देसाईगंज ५, कुरखेडा १६, कोरची १७, धानोरा ३५, चामोर्शी १२, मुलचेरा ७, अहेरी २१, एटापल्ली ४, भामरागड ४ आणि सिरोंचा १० याप्रमाणे वाटण्यात आले.