जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या ग्रामीण क्षेत्रातील युवक विस्तार कार्यक्रमांतर्गत कल्पतरू बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयाेजित बेराेजगार युवकांच्या कार्यशाळेत ते बाेलत हाेते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही याप्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रंचित पाेरेड्डीवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कल्पतरू बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कृणाल पडलवार हाेते. प्रमुख अतिथी म्हणून माणिक ढाेले, मार्गदर्शक म्हणून राेझिना राणा उपस्थित हाेत्या. याप्रसंगी राेझिना राणा म्हणाल्या, विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण, आवड आणि शेवटी जीवनात उदरनिर्वाहाचे साधन या दृष्टीने करिअर निवडावे. माणिक ढाेले यांनी मनाची घडण याेग्य असली की, शरीर सुदृढ राहते. आनंदी राहुन काम करावे व शिक्षणाचा उपयाेग जिल्हा विकासात करावा, असे आवाहन केले.
प्रास्ताविक कृणाल पडलवार, संचालन दीपाली बाेरकुटे यांनी केले. यशस्वीतेसाठी पुष्पक सेलाेकर, शीतल गेडाम, काेमल कापकर, चेतना म्हशाखेत्री, स्नेहा काेटांगले, राजश्री खाेब्रागडे यांनी सहकार्य केले.
बाॅक्स ......
यांचा झाला सत्कार
कार्यक्रमादरम्यान इयत्ता दहावीच्या परीक्षेतील गुणवंत मानस पाटील, लिझना लाखानी, दहावी सीबीएससी परीक्षेत यश मिळविणारे निनाद कांबळे, आर्यन कानताेडे, बारावी बाेर्डाच्या परीक्षेतील गुणवंत गायत्री साेनटक्के, सीबीएससी परीक्षेतील अयुब कुरेशी, मयुरी बाेरेवार, जेईई परीक्षेत यश मिळविणारी राखी सहारे, गाैरीकांत मुडके, नीट परीक्षेतील गुणवंत प्राची काेठारे, वैभव नैताम, हर्षाली चाैधरी, प्रणाली काेवे, युगांत गहाणे, अनुजा मेश्राम, फ्रेझी टेंभुर्णे, सिद्धेश पाेशटवार, श्रेया धात्रक, शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत सृष्टी धाेटे, समीक्षा मालदे, नंदिनी भैसारे, तेजस भांडेकर, जवाहर नवाेदय विद्यालयातील यशस्वी विद्यार्थी संघर्ष भाकरे, श्रद्धा भैसारे आदी गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते गाैरव करण्यात आला.