लोकमत न्यूज नेटवर्कवेलगूर : अहेरी तालुक्यातील वेलगूर येथील मुख्य मार्ग व अंतर्गत रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. चिखलातूनच नागरिकांना मार्गक्रमण करावे लागत आहे.वेलगुर येथील मुख्य रस्त्यावर समाजभवनासमोर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे. सपण हलदार ते पेंटी डोर्लीकर यांच्या घरापर्यंतचा सिमेंटचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. हनुमान मंदिर ते वेलगुर येथील आरोग्य उपकेंद्राकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याच्या सळाखी बाहेर निघल्या आहेत. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. राजे धर्मराव हायस्कूल समोरील रस्ता पूर्णपणे चिखलाने माखला आहे. या चिखलातूनच दुचाकी व चारचाकी न्याव्या लागत आहेत. जिल्हा परिषदेने वेलगूर येथील अंतर्गत रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेकडे केली असली तरी जिल्हा परिषदेची या गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण रस्त्यांचे काँक्रीटीकरण करावे, अशी मागणी आहे.
वेलगुर येथील अंतर्गत रस्ते चिखलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 12:03 AM