लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : गडचिरोली वनवृत्तातील वनपाल व वनरक्षक यांच्यासाठी गणवेश खरेदीसाठी राबविलेली प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वनपाल व वनकर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश शेरेकर यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.वनपाल व वनकर्मचारी यांना शासनाकडून गणवेश व इतर महत्त्वाचे साहित्य खरेदी करण्यासाठी वार्षिक ५ हजार १६७ रूपये मंजूर केले आहेत. २०१७-१८ या वर्षात गणवेश व साहित्य खरेदी करण्याची प्रक्रिया मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने नियबाह्यरित्या राबविली आहे. सुमारे ६१ लाख ७४ हजार ५६५ रूपयांची खरेदी असतानाही ई-निविदा काढण्यात आली नाही. गणवेश साहित्य खरेदी समितीमध्ये वनरक्षक, वनपाल यांच्या प्रतिनिधींना स्थान देण्यात आले नाही. साहित्याचा दर्जा व गुणवत्ता ठरविताना कोणते निकष लावले, हे सुद्धा कळले नाही. सदर प्रक्रिया संशयास्पद असल्याने ती रद्द करावी, अशी मागणी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गणवेश खरेदीची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 1:36 AM
लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : गडचिरोली वनवृत्तातील वनपाल व वनरक्षक यांच्यासाठी गणवेश खरेदीसाठी राबविलेली प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वनपाल व वनकर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश शेरेकर यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.वनपाल व वनकर्मचारी यांना शासनाकडून गणवेश व इतर महत्त्वाचे साहित्य खरेदी करण्यासाठी वार्षिक ५ हजार ...
ठळक मुद्देपालकमंत्र्यांना निवेदन : वनरक्षक, वनपाल संघटनेची मागणी