लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : कमी पैशात मौल्यवान वस्तू देण्याचे आमिष दाखवून देसाईगंज शहरातील अनेक लोकांना कोट्यवधी रुपयांनी गंडविणाऱ्या व गेल्या दोन दिवसांपासून पसार झालेल्या त्या महिलेवर देसाईगंज पोलिसांनी अखेर भादंविचे कलम ४२० अन्वये रविवारी रात्री गुन्हा दाखल केला.शबाना उर्फ शिफा राज मोहम्मद चौधरी उर्फ शबाना मोहमद शेख रा.शिवाजी वार्ड देसाईगंज असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. १० हजार रुपयात एक तोळे सोने, २० हजार रुपयात दुचाकी व अडीच लाख रुपयात चारचाकी वाहन देण्याचे आमिष दाखवून शिफा नामक महिलेने अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केली. इतकेच नव्हे तर १७ हजार रुपयांत घरकूल बांधकाम तसेच पैशाच्या मोबदल्यात नोकरी मिळवून देण्याची हमी सुध्दा या महिलेने कित्येकांना दिली होती.गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारींवर तब्बल ३५ लोकांच्या स्वाक्षºया आहेत. या गुंतवणूकदारांनी सदर महिलेकडे किती रुपयाची गुंतवणूक केली होती, याचे आकडेही तक्रारीत नमूद केले आहेत. ५० हजार रुपयांपासून १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांनी तक्रारीत म्हटले आहे. सर्व गुंतवणूकदारांचा आकडा मिळून हा आकडा पाच कोटींच्या वर जात आहे.अनेक लोकांची आर्थिक फसवणूक करणाºया शिफाने शनिवारी देसाईगंजातून पोबारा करण्यापूर्वी गुंतवणूकदारांचे दस्तावेज जाळून फसवणूक केल्याचे पुरावे नष्ट केले. आता सदर व्यवहारात कोणत्याही प्रकारचा कागदी पुरावा नसल्याचे दिसून येत आहे. कमी किमतीत वस्तू मिळण्याच्या लोभापायी देसाईगंजवासीयांना चांगलाच फटका बसला असून त्या महिलेचा शोध घेण्याची मागणी होत आहे.‘लोकमत’च्या वृत्तानंतर धावाधावकोट्यवधी रुपयाने गंडविणारी ती महिला पसार झाल्याचे वृत्त रविवारी ‘लोकमत’मध्ये झळकताच या महिलेकडे गुंतवणूक करणाºया अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली. सदर महिलेच्या घरासमोर लोकांची गर्दी जमली. परंतू ती पसार झाल्याने कोणालाच भेटली नाही. दरम्यान गुंतवणूकदारांनी रविवारी देसाईगंज पोलीस ठाणे गाठून सदर महिला व तिच्यासोबत राहणाºया इसमाविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून देसाईगंज पोलिसांनी शिफा नामक महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.घरी पुरूषांना घातली होती प्रवेशबंदीशिफाने ब्युटी पार्लर असलेल्या देसाईगंज येथील आपल्या घरी पुरूषांना प्रवेश नसल्याची नोटीस चिपकविली आहे. एवढेच नव्हे तर रक्कम गुंतविल्यानंतर संबंधित गुंतवणूकदारांना टप्प्याटप्प्याने साहित्य दिले जाणार असल्याचीही नोटीस घराच्या भिंतीवर चिपकविली होती. हा व्यवसाय करण्यासाठी सदर महिला अव्वाच्या सव्वा व्याज दराने इतर लोकांकडून रक्कमही घेत होती. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून शहरातील नामांकित उद्योगपतींचेही शिफाच्या घरी येणे-जाणे सुरू होते, अशी माहिती आता पुढे आली आहे. एकूणच सदर फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर देसाईगंज शहरात खळबळ माजली आहे.
गुंतवणूकदारांचा आकडा पाच कोटींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 10:51 PM
कमी पैशात मौल्यवान वस्तू देण्याचे आमिष दाखवून देसाईगंज शहरातील अनेक लोकांना कोट्यवधी रुपयांनी गंडविणाऱ्या व गेल्या दोन दिवसांपासून पसार झालेल्या त्या महिलेवर देसाईगंज पोलिसांनी अखेर भादंविचे कलम ४२० अन्वये रविवारी रात्री गुन्हा दाखल केला.
ठळक मुद्देदस्तावेज जाळून पुरावे केले नष्ट : कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या ‘त्या’ महिलेवर गुन्हा दाखल