मार्गावर ट्रक फसले : कच्च्या रस्त्याचा परिणामलोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : पहाडावर जाण्यास तयार करण्यात आलेल्या कच्च्या रस्त्यामध्ये ट्रक फसत असल्याने पावसाळ्यादरम्यान लोहखनिजाची वाहतूक जवळपास दोन महिने बंद राहणार आहे. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावरील लोहखनिजाचे उत्खनन करून सदर लोहखनिज चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथे नेला जात आहे. उन्हाळभर हे काम शेकडो ट्रकच्या सहाय्याने केले जात होते. ८० ट्रकची जाळपोळ नक्षल्यांनी केल्यानंतर पोलीस विभागाच्या कडक बंदोबस्तात लोहखनिजाची वाहतूक सुरू होती. पहाडावर जाण्यासाठी कंपनीने कच्चा रस्ता तयार केला आहे. या रस्त्यावरूच आजपर्यंत ट्रका जात होत्या. मात्र पाऊस पडल्यानंतर कच्च्या मार्गावर ट्रक फसण्यास सुरूवात झाली. या ठिकाणावरून आताच पक्का रस्ता तयार करणे कंपनीला शक्य नाही. त्यामुळे पावसाळ्यादरम्यान वाहतूक बंद ठेवल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मंगळवारी मोदूमडगु गावाजवळ काही ट्रक फसल्याने या ठिकाणावरून सुमारे १०५ ट्रक परत गेले.
लोह खनिजाची वाहतूक राहणार बंद
By admin | Published: June 16, 2017 12:49 AM