शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

तुकूम येथील सिंचन बंधारा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:37 AM

जिल्हा परिषद सिंचन विभागाने लाखो रूपये खर्चुन २००८ साली तुकूम शेतशिवारातील नाल्यावर बंधारा बांधला. सदर बंधारा अल्पावधीतच फुटला असून यामुळे १०० एकर शेती धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची प्रशासनाकडे धाव : परिसरातील १०० एकर शेती धोक्यात; मागील वर्षी स्वत:च केली दुरूस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : जिल्हा परिषद सिंचन विभागाने लाखो रूपये खर्चुन २००८ साली तुकूम शेतशिवारातील नाल्यावर बंधारा बांधला. सदर बंधारा अल्पावधीतच फुटला असून यामुळे १०० एकर शेती धोक्यात आली आहे.धानोरा तालुक्यात जंगलाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मोठा सिंचन प्रकल्प बांधणे अशक्य आहे. या तालुक्यात सर्वाधिक धानाचे पीक घेतले जाते. या पिकासाठी मोठ्या प्रमाणात सिंचनाची आवश्यकता भासते. या परिसरात लहान-मोठे नाले आहेत. या नाल्यांवर बंधारे बांधल्यास जवळपासच्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने धानोरा तालुक्यात अनेक बंधारे बांधले. धानोरा तालुकास्थळापासून जवळच असलेल्या तुकूम येथील शेतशिवारातही जिल्हा परिषदेने सन २००८-०९ मध्ये बंधारा बांधला. या बंधाºयावर लाखो रूपये खर्च केले. या बंधाºयाच्या माध्यमातून जवळपास १०० एकर शेतीला सिंचनाची सुविधा उलब्ध झाली होती. मात्र सिंचन विभागाने बंधाºयाची देखभाल व दुरूस्ती केली नाही. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी बंधाºयाच्या बाजूची माती वाहून गेली व बंधारा फुटला. त्यानंतर शेतकºयांनी बंधारा दुरूस्त करून देण्याची अनेकवेळा मागणी जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडे केली आहे. मात्र बंधारा दुरूस्तीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध होत नसल्याचे कारण सिंचन विभागाने बंधाºयाची दुरूस्ती केली नाही. सिंचन विभाग बंधाºयाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात घेऊन शेतकºयांनी मागील वर्षी स्वत:कडचे पैसे गोळा करून जेसीबीच्या सहाय्याने बंधाºयाची दुरूस्ती केली. मात्र पाच दिवसांपूर्वी झालेल्या पावसात बंधाºयाची बाजूची माती पुन्हा वाहून जाऊन बंधारा फुटला आहे. प्रचंड प्रमाणात भगदाड पडला असल्याने आता शेतकरी सुद्धा हवालदिल झाले आहेत. बंधाºयात पाणी साचून राहत नसल्याने आता या परिसरातील जवळपास ३० शेतकºयांची १०० एकर शेती धोक्यात आली आहे. पाण्याअभावी रोवणीची कामे सुद्धा आता रखडली आहेत.शेतकºयांनी धानोराचे तहसीलदार महेंद्र गणवीर यांना निवेदन दिले. तहसीलदारांनी निवेदनाची दखल घेत बंधाºयाची पाहणी केली. दुरूस्तीसाठी सिंचन विभागाने पुढाकार घ्यावा, यासाठी पत्र लिहिले.तहसीलदारांना निवेदन देतेवेळी शेतकरी भोजराज रायसिडाम, मंगल सिडाम, चिन्नू कोरेटी, घनश्याम सिडाम, देवाजी तोफा, बाबुराव तोफा, श्यामराव तोफा, रवींद्र मेश्राम, चंदू उसेंडी, सुभाष उसेंडी, रघुनाथ नैताम, आनंदराव आतला, मणिराम हलामी, वातू आतला, सायत्राबाई हलामी यांच्यासह परिसरातील शेतकरी हजर होते. जिल्हा परिषदेने बंधारा दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे. बंधाºयाची दुरूस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर