नजीकच्या नागेपली येथील नागेपली-आलापली मुख्य रस्त्यावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाजूला सार्वजनिक कामासाठी तसेच स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित करून जागा राखून ठेवण्यात आली आहे. या राखीव जमिनीवर व बाजूला काही नागरिकांनी अतिक्रमण केले असून, लहान-लहान झोपड्या बांधून वास्तव्य करत आहेत. त्यामुळे स्मशानभूमीसाठी जमीन उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे अतिक्रमणधारक व गावातील नागरिकांमध्ये वाद निर्माण झाला होता. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी रविवारी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यांच्या मध्यस्थीने चर्चा करण्यात आली. आज ग्रामपंचायत कार्यालयात याबाबत तोडगा निघणार आहे.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, नागेपलीचे सरपंच लक्ष्मण कोडापे, पंचायत समिती सदस्या योगीता माेहूर्ले, अशोक रापेलीवार, किस्टापूरचे माजी उपसरपंच अशोक येलमुले, विशाल रापेलीवार, रेड्डी सावकार, प्रशांत गोडसेलवार, आदी उपस्थित हाेते.