ऑनलाईन लोकमतएटापल्ली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू झाली आहे. मात्र या परीक्षेदरम्यान एटापल्ली तालुक्याच्या जारावंडी येथील शासकीय आश्रमशाळेच्या केंद्रावर खुलेआम कॉपीचा प्रकार सुरू आहे. मात्र या गैरप्रकाराकडे भरारी पथकांसह शिक्षण विभागाच्या अधिकाºयांचे दुर्लक्ष आहे.१ मार्चला इयत्ता दहावीचा पहिला मराठी विषयाचा पेपर झाला. त्यानंतर सोमवारी हिंदी विषयाचा पेपर होता. या पेपरदरम्यान जारावंडी येथील शासकीय आश्रमशाळेच्या केंद्राच्या परिसरात याच शाळेच्या विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रीकेतील उत्तरे गाईडमधून शोधण्याचे काम सुरू होते. परीक्षा हॉलमधून प्रश्नपत्रीकेतील प्रश्न समजल्यावर त्याचे उत्तर गाईडमधून पाहिले जात होते, त्यानंतर गाईडमधील पाने फाडून संबंधित परीक्षार्थ्यांपर्यंत कॉपीचा पुरवठा केला जात होता. याबाबतचे छायाचित्र कॅमेराबद्ध करण्यात आले.एटापल्ली तालुका मुख्यालयापासून जारावंडी हे ५५ किमी अंतरावर आहे. भामरागड एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत असलेल्या एटापल्ली तालुक्यातील कसनसूर व जारावंडी येथे इयत्ता दहावीचे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. मात्र जारावंडीच्या परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार केला जात आहे.
इथे चालते खुलेआम कॉपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 1:04 AM
महाराष्ट्र राज्य माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू झाली आहे. मात्र या परीक्षेदरम्यान एटापल्ली तालुक्याच्या जारावंडी......
ठळक मुद्देकॉपीमुक्त अभियानाचा फज्जा : जारावंडी येथील शासकीय आश्रमशाळेच्या केंद्रावरील प्रकार