देसाई
देसाईगंज: अलिकडे महिलांवर होत असलेल्या अत्याचारात सातत्याने वाढ होत असले तरी अनेकदा महिलांना देण्यात आलेल्या अधिकाराचा दुरुपयोगही होत असल्याचे समोर येऊ लागले आहे. यामुळे अनेकदा पिडीतांना अपेक्षित न्याय मिळु शकत नाही. व आरोपी निर्दोष सुटतो. त्यामुळे आपल्यावर खरच अत्याचार झालाच असेल तर झालेल्या अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्याचा आपल्याला पुर्ण अधिकार आहे. केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने खोट्या तक्रारी करुन न्यायालयाचा वेळ व्यर्थ घालवण्यात येऊ नये, कायद्याच्या दुरुपयोग थांबविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन देसाईगंज न्यायालयाचे न्यायाधीश आनंद भडके यांनी केले.
देसाईगंज येथील न्यायालयाच्या सभागृहात तालुका विधी सेवा समिती देसाईगंज व तालुका विधीज्ञ संघ देसाईगंज यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक महिला दिना निमित्त कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर आयोजीत करण्यात आला होता, याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जेष्ठ अधिवक्ता संजय गुरु, पि.एन.बुद्धे, एस. एन.रासेकर, सहा.सरकारी अभियोक्ता ए.एफ.फुलझेले आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
संचालन लिपीक आचल पाटिल यांनी तर आभार प्रदर्शन नेहा इलमुलवार यांनी केले.