प्रधानमंत्री गरीब कल्याण याेजनेअंतर्गत केंद्र शासनाने मे ते नाेव्हेंबर महिन्यांपर्यंत गरीब वर्गाला माेफत धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नियमित मिळणारे धान्य व माेफत मिळणारे धान्य असे महिन्यातून दाेनवेळा धान्य उपलब्ध करून द्यावे लागते. हे सर्व करताना पुरवठा विभागाच्या यंत्रणेची चांगलीच दमछाक उडत आहे. काेरची, कुरखेडा, धानाेरा तालुक्यांतील दुर्गम भागातील गावांमध्ये धान्य पाेहाेचण्यास उशीर हाेत असल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स....
पावतीवरील किंमत व धान्य कपात
पुरवठा विभागाचा पूर्ण कारभार ऑनलाईन झाला आहे. त्यासाठी प्रत्येक दुकानदाराला पाॅस मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपल्याला किती धान्य मिळणार आहे व त्याची किंमत किती, याची पावती पाॅस मशीनमधून निघते. पावतीवर जेवढे धान्य दर्शविण्यात आले आहे, तेवढे धान्य दुकानदाराकडून मागावे.
बाॅक्स...
पावसामुळे पुरवठ्यात व्यत्यय
अनेक गावांपर्यंत पक्के रस्ते झाले नाहीत. पावसाळ्यात कच्च्या रस्त्यांवरून धान्य भरलेले अवजड वाहन नेणे कठीण हाेते. त्यामुळे रस्ता वाळण्याची प्रतीक्षा करावी लागते. अशा गावांमध्ये धान्य पाेहाेचण्यास उशीर हाेतो.
काेट...
नियमित धान्यच पुरेसे हाेते. अतिरिक्त धान्य देण्याची गरज नव्हती. केवळ धान्य देण्याऐवजी केंद्र शासनाने साखर, डाळ, खाद्यतेल यासारख्या वस्तू देण्याची गरज हाेती. आमच्या गावात नेहमीच धान्य उशिरा दिले जाते. याबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही.
- मनाेहर हिचामी, लाभार्थी
.............
काेराेनाच्या काळात घरीच बसून राहावे लागले. आता लाॅकडाऊन हटला असला तरी राेजगाराची समस्या कायम आहे. केंद्र शासनाने माेफत धान्य उपलब्ध करून देण्याचा घेतलेला निर्णय अतिशय याेग्य आहे. मात्र, वेळेवर धान्य पाेहाेचेल यासाठी प्रशासकीय यंत्रणेनेे प्रयत्न करण्याची गरज आहे.
- शिवराम साेनकुसरे, लाभार्थी