शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

जहाल माओवादी मन्याची अखेर पोलिसांपुढे शरणागती; आठ खुनांसह ३४ गुन्हे: सहा लाखांचे होते बक्षीस

By संजय तिपाले | Published: August 30, 2024 9:58 PM

गडचिरोली: सदस्य ते एरिया कमिटी सदस्य अशी मजल मारणारा व दहशतीच्या जोरावर आठ खुनांसह तब्बल ३४ गुन्हे करणारा जहाल ...

गडचिरोली: सदस्य ते एरिया कमिटी सदस्य अशी मजल मारणारा व दहशतीच्या जोरावर आठ खुनांसह तब्बल ३४ गुन्हे करणारा जहाल माओवादी केदार उर्फ मन्या किंजो नैताम(वय ४२ , रा. कोसमी क्र. -१ ता. धानोरा) याने अखेर ३० ऑगस्टला पोलिसांपुढे शरणागती पत्करली. त्याच्या नावावर ६ लाखांचे बक्षीस होते.

केदार उर्फ मन्या नैताम हा २००२ मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाला होता. २००७ ते २०१२ दरम्यानदक्षिण गडचिरोली डिव्हीजन मध्ये तांत्रिक टीममध्ये त्याने काम केले. २०१२ ते २०२० या दरम्यान तो टिपागड एरिया प्लाटून १५ मध्ये सक्रिय होता.२०२० मध्ये त्याची एरिया कमिटी सदस्य पदावर बढती झाली होती.तेव्हापासून तो दक्षिण सब झोनल ब्युरोमध्ये तांत्रिक टीममध्ये सक्रिय होता. मात्र, त्याने आत्मसमर्पण केले. त्यामुळे नक्षल्यांना आणखी एक धक्का बसला आहे.त्याला शासनाकडून पुनर्वसन योजनेद्वारे साडेचार लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे......आतापर्यंत २५ जणांचे आत्मसमर्पणमाओवादविरोधी अभियान प्रभावीरीत्या राबविल्यामुळे २०२२ ते २०२४ या कालावधीत एकूण २५ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यासाठी नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, राज्य राखीव दलाचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा , पोलिस अधीक्षक नीलोत्पल,यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण मोहीम सुरु आहे.....अशी आहे गुन्हे कारकीर्दकेदार उर्फ मन्या नैतामवर ३४ गुन्हे नोंद आहेत. यात चकमक १८ ,२ जाळपोळ, ८ निरपराध व्यक्तींचे खून या गुन्ह्यांचा समावेश आहे.२००४ मधील मानेवारा, बंदूर, २०१४ मध्ये बोटेझरी , २०१६ मध्ये दराची, २०१९ मध्ये गांगीन, २०२० मध्ये किसनेली, २०२१ मध्ये कोडूर जंगलातील चकमकीत त्याचा सक्रिय सहभाग होता.....विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­ऱ्या माओवाद्यांवर पोलिस दलाच्या कारवाया सुरु आहेत. माओवाद्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी पोलिस दल सर्वतोपरी मदत करत आहे. त्यामुळे माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करावे.- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली

टॅग्स :naxaliteनक्षलवादी