राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार धर्मरावबाबा आत्राम, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारचा निषेध नोंदवून, मोदी सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली.
गॅस, इंधन, पेट्रोल व डिझेलची भाववाढ व महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याने गॅस व दुचाकी वाहनाचे प्रतीकात्मक स्वरूपात श्राद्ध करून पुष्प व फुले वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी शाहीन हकीम यांनी मोदी सरकार खोटी स्वप्ने दाखवून केंद्रात सत्तेवर बसले; पण महागाई वाढवून जनतेला रस्त्यावर आणले. त्यामुळे गॅस, पेट्रोल, डिझेल व केंद्र शासनाशी निगडित तत्सम जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात याआधी अनेकदा आंदोलने केले असून, आता अंत न पाहता तत्काळ भाववाढ कमी करण्याची मागणी हकीम यांनी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार, महिला तालुकाध्यक्षा सारिका गडपल्लीवार, ज्येष्ठ नेत्या पुष्पा अलोने, शैलेश पटवर्धन, सुरेंद्र अलोने, ममता पटवर्धन, बुधाजी सिडाम, महेश अलोने, सालय्या कंबलवार, शैलेश गेडाम, सुमित मोतकूरवार, पराग पांढरे, स्वप्निल श्रीरामवार, सोमेश्वर रामटेके, शोभा मडावी, मखमूर शेख, योगेश दंडीकवार, सोहेल शेख, नफी पठाण, अशोक वासेकर, महेश बाकेवार, तिरुपती मडावी, आदी उपस्थित होते.
040721\1445img-20210704-wa0192.jpg
*अहेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जनआक्रोश आंदोलन*