लाेकमत न्यूज नेटवर्ककुरुड : बहुतांश सैनिक सैन्यदलातून सेवानिवृत्तीनंतर विविध व्यवसाय करतात. काहीजण शेती न करता बिझनेस तर काही सरकारी नोकरी करतात. परंतु काेंढाळा येथील सेवानिवृत्त सैनिक देवीदास नागोसे यांनी शेतीला पसंती दर्शवित कोंढाळा येथे दोन एकर शेती घेऊन शेतीमध्ये मिरची, कारले, गहू, वांगी पीक पेरुन शेती फुलविली आहे. या माध्यमातून नागाेसे यांची शेती फायदेशीर ठरत आहे. अनेक शेतकरी पारंपरिक शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यामुळे आवश्यक प्रमाणात उत्पादन ते घेऊ शकत नाही. भाजीपाला पिकातून अधिकाधिक उत्पादन घेता येते. ही बाब ओळखून काेंढाळा येथील सेवानिवृत्त सैनिक देवीदास नागाेसे यांनी सैन्यदलातून सेवानिवृत्तीनंतर शेती क्षेत्र निवडले. कमी शेती क्षेत्रातून अधिक उत्पादन कसे घेता येईल यासाठी त्यांनी भाजीपाला पिकाची लागवड केली. दोन एकर शेतीमध्ये एका एकरात कारले, मिरची आणि वांगी लावली तर उर्वरित क्षेत्रात हरभरा पेरला आहे. मिरचीची पहिली तोडणी झाली आहे. सध्या ५ क्विंटल मिरचीचे उत्पादन निघाले आहे. उर्वरित तोडणी शिल्लक आहे. पुन्हा आठ ते नऊ क्विंटल मिरचीचे उत्पादन निघण्याची शक्यता नागाेसे यांनी व्यक्त केली आहे. नागाेसे हे उत्पादित शेतमाल देसाईगंजच्या बाजारात विकतात. यातून त्यांना बराच नफा मिळत आहे. श्रम केल्यास भाजीपाल्याची शेती फायद्याची आहे. इतरही शेतकऱ्यांनी भाजीपाल्यासह इतर पिकांचे उत्पादन काढावे, असा सल्ला माजी सैनिक नागाेसे यांनी दिला आहे.
जवानाने किसान बनून फुलविली नफ्याची शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 5:00 AM
कमी शेती क्षेत्रातून अधिक उत्पादन कसे घेता येईल यासाठी त्यांनी भाजीपाला पिकाची लागवड केली. दोन एकर शेतीमध्ये एका एकरात कारले, मिरची आणि वांगी लावली तर उर्वरित क्षेत्रात हरभरा पेरला आहे. मिरचीची पहिली तोडणी झाली आहे. सध्या ५ क्विंटल मिरचीचे उत्पादन निघाले आहे. उर्वरित तोडणी शिल्लक आहे. पुन्हा आठ ते नऊ क्विंटल मिरचीचे उत्पादन निघण्याची शक्यता नागाेसे यांनी व्यक्त केली आहे.
ठळक मुद्देकाेंढाळात माजी सैनिकाचे भाजीपाला उत्पादन ठरतेय प्रेरणादायी