तहसीलदार उपस्थित : वाहतूक झाली सुरळीतवैरागड : वैरागड-रांगी मार्गावरील खोब्रागडी नदीवरील करपडा घाट पुलावरील कचरा जेसीबीच्या सहाय्याने महसूल विभागाने सोमवारी काढला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. शनिवारच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे खोब्रागडी नदीला पूर आला होता. पुराचे पाणी करपडा घाट पुलावरून वाहत होते. पाण्यासोबतच जंगलातील काडीकचरा, लाकूडही वाहत आले. सदर काडीकचरा पूर ओसरल्यानंतर पुलावरच पडून होता. त्यामुळे पूर जरी ओसरला तरी या पुलावरून वाहतूक करणे शक्य नव्हते. ही बाब स्थानिक नागरिकांनी महसूल विभागाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर महसूल विभागाने भाड्याची जेसीबी करून या जेसीबीच्या सहाय्याने पुलावरील काडीकचरा काढला. सोमवारी दुपारी ३ वाजतानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. जेसीबीच्या सहाय्याने पुलावरील कचरा काढतेवेळी आरमोरीचे तहसीलदार मनोहर वलथरे, मंडळ अधिकारी घरत, तलाठी डी. एल. कुबडे उपस्थित होते. (वार्ताहर)
करपडा घाट पुलावरील कचरा जेसीबीने काढला
By admin | Published: September 13, 2016 12:58 AM