लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा गावालगत प्राणहिता नदी बारमाही वाहते. या नदीला वर्षभर मोठ्या प्रमाणात पाणी असते. नदीपलिकडे तेलंगणा राज्याचा भाग आहे. तेलंगणाच्या काठावर अर्जूनगुट्टा नावाचे गाव आहे. नदीकाठापर्यंत डांबरी रस्ता आहे. तेलंगणा राज्याच्या बसेस नदीकाठावर येतात. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक प्रवाशी दररोज तेलंगणाच्या चेलुर व मंचेरियाल गावाला जाण्यासाठी नावेने नदीपात्रातून प्रवास करतात व पलिकडे जाऊन बस पकडतात. सिरोंचा तालुक्यात ही वाहतूक गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.सिरोंचा नजीकच्या गोदावरी नदीवरील पुलावरून तेलंगणा राज्याच्या बसेस सिरोंचात दाखल होतात. तेलंगणाच्या भागाकडे कालेश्वरम, महादेवपूर, करिमनगर, वरंगल, हैदराबाद असा प्रवास करणारे प्रवाशी या बसेसमधून प्रवास करतात. या बसेसमधून मंचेरियाल चिलूर जाणे म्हणजे आर्थिकदृष्ट्या महागडे पडते. दुप्पट व तिप्पट रक्कम प्रवाशांना मोजावी लागते. त्यामुळे थेट सोयीचा व परवडणारा मार्ग म्हणून सिरोंचा तालुक्यातील अनेक प्रवाशी नदीपात्रातून नावेने प्रवास करतात. पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर काही महिने कालेश्ववरून प्राणहिता नदीतील रस्त्यावरून मंचेरियालपर्यंत बस वाहतूक सुरू होती. परंतु पावसाळ्यात नदीपात्रात पाणी पातळी वाढल्याने ही बससेवा बंद झाली. आता धर्मपुरी गावाजवळ प्राणहिता नदीवर पुलाचे बांधकाम होत आहे. पुढील वर्षाच्या अखेरीस या पुलाचे बांधकाम पूर्ण होणार असल्याची माहिती आहे.सदर पूल पूर्णत्वास आल्यास प्राणहिता नदीतून होणारा नावेचा प्रवास बंद होणार आहे.
सिरोंचावासियांचा नावेने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 11:29 PM
सिरोंचा गावालगत प्राणहिता नदी बारमाही वाहते. या नदीला वर्षभर मोठ्या प्रमाणात पाणी असते. नदीपलिकडे तेलंगणा राज्याचा भाग आहे. तेलंगणाच्या काठावर अर्जूनगुट्टा नावाचे गाव आहे.
ठळक मुद्देप्राणहिता नदीपरिसरात वर्दळ : थेट सोयीचा मार्ग म्हणून अनेकांची पसंती