सिराेंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरात वीज, पक्के रस्ते, नाली बांधकाम, १२वीनंतरचे शिक्षण, आराेग्याच्या उत्तम साेयी तसेच अन्य साेयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागताे. झिंगानूरपासून ३ किमी अंतरावर असलेल्या मंगीगुडम येथे जाताना एक नाला आडवा येताे. या नाल्यावर पुलाचा अभाव आहे. अनेक वर्षांपासून नागरिक पावसाळ्यात पुराच्या पाण्यातूनच प्रवास करतात. १४ ऑगस्ट राेजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मंगीगुडम येथील वंगा मेंगा गावडे या गंभीर रुग्णाला बैलबंडीवर पुराच्या पाण्यातून न्यावे लागले. अशा प्रकारे अनेक गंभीर रुग्णांना रुग्णालयात नेताना अडचणी येतात. कच्चे रस्ते व पुलांचा अभाव असल्याने चार चाकी किंवा दुचाकी वाहनानेसुद्धा नेता येत नाही. त्यामुळे मंगीगुडम येथील नाल्यावर पुलाचे बांधकाम करून परिसरात पक्के रस्ते बांधावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पुलाअभावी नाल्यातून धाेकादायक प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 4:39 AM