शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

क्षणार्धात उडी घेतली अन् ‘ते’ दाेघेही बचावले; मोटरसायकलचा  झाला चेंदामेंदा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 9:23 PM

Gadchiroli News अवजड ट्रक घाटावर चढत असताना अचानक मागे येऊ लागला. याचवेळी त्याच्या मागे दाेघेजण एका दुचाकीवर हाेते; परंतु दाेघांनीही सतर्कता व समयसूचकता बाळगून वेळीच दुचाकीवरून बाजूला उडी घेतली व ते थाेडक्यात बचावले.

गडचिराेली : अवजड ट्रक घाटावर चढत असताना अचानक मागे येऊ लागला. याचवेळी त्याच्या मागे दाेघेजण एका दुचाकीवर हाेते; परंतु दाेघांनीही सतर्कता व समयसूचकता बाळगून वेळीच दुचाकीवरून बाजूला उडी घेतली व ते थाेडक्यात बचावले. मात्र, त्यांची दुचाकी ट्रकच्या दाेन चाकांच्या मधाेमध सापडून चेंदामेंदा झाला. ही घटना काेरची तालुक्याच्या पुराडा-बेळगाव घाटावर मंगळवार २३ मे राेजी घडली.काेरची येथील पारबताबाई विद्यालयाचे लिपिक श्यामराव उंदीरवाडे आणि याच शाळेतील सहायक शिक्षक जीवन भैसारे हे मोटारसायकलने गडचिरोली येथे पगार बिल सादर करण्यासाठी मंगळवारी सकाळी काेरचीहून निघाले.

बेळगावपासून ७ किमी अंतरावर असलेल्या घाटातील चढावर एक ट्रक वर चढत होते. याचवेळी विरुद्ध दिशेने एक ट्रक खाली येत होते. उंदीरवाडे व शिवणकर यांची मोटार सायकल वर चढणाऱ्या ट्रकच्या मागे होती; परंतु वर चढणारा ट्रक अचानक रिव्हर्स येऊ लागला. हे ओळखून क्षणाचाही विलंब न करता मोटार सायकलस्वार जीवन भैसारे आणि श्यामराव उंदीरवाडे यांनी मोटारसायकलवरून उडी घेतली. त्यामुळे काेणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु माेटारसायकलचा चेंदामेंदा झाला.आंतरराज्यीय अवजड वाहतूक धाेकादायकबेळगाव ते पुराडा या २० किमी अंतरादरम्यान डोंगर, दऱ्या, घनदाट जंगल आहे. तसेच हा रस्ता नागमाेडी वळणाचा आहे. या मार्गाने राज्यातील अवजड वाहनांची छत्तीसगड राज्यात २४ तास वर्दळ असते. वाहनांच्या वर्दळीच्या प्रमाणात हा रस्ता याेग्य नाही. हा मार्ग एकेरी व अरुंद असल्याने या मार्गावर नेहमीच अपघात होतात. सदर मार्गाचे रुंदीकरण व नूतनीकरण करणे गरजेचे आहे.अन्यथा आंतरराज्यीय अवजड वाहतूक लाेकांचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :Accidentअपघात