देसाईगंज नगर परिषदेचे वार्षिक आर्थिक बजेट कोट्यवधी रुपयांचे आहे. यातून लाखो रुपये खर्च करून शहराच्या मुख्य चौकात फव्वारा बसविण्यात आला. यासाठी विहीर खोदून तेथे मोटारपंप बसविले. तसेच फव्वाऱ्याचे अधिक सुशोभीकरण करण्यासाठी रंगीबेरंगी दिवे लावले. मात्र, सदर फव्वारा मागील अनेक वर्षांपासून बंदच असल्याने करण्यात आलेल्या खर्चावर एकूणच प्रश्नचिन्ह लावले जात आहे. विशेष म्हणजे, फव्वारा चौकाच्या सभोवताली किरकोळ दुकानदार आपापल्या दुकानदाऱ्या थाटून चौकच गिळंकृत केले आहे. मात्र, यावर कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासन मागेपुढे पाहत आहे, असा आराेप नागरिकांकडून हाेत आहे.
बाॅक्स
चाैकाचे पुनरुज्जीवीकरण हाेणार काय?
देसाईगंज शहराच्या मुख्य चौकात लावण्यात आलेला फव्वारा एकेकाळी शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा हाेता. यावर लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला फव्वारा सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. याठिकाणी वाढलेल्या गवतपाल्यांनी फव्वारा मशीनही कवेत घेतल्याने अस्वच्छतेचा विळखा आहे. शहरात शासकीय बांधकामे, विद्युतीकरण करण्यावर प्रशासन भर देत असले तरी मुख्य चौकातील फव्वाऱ्याच्या दुरुस्तीकडे कानाडाेळा आहे. आतातरी सदर चाैकाचे पुनरुज्जीवीकरण हाेणार काय? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
120921\3520img_20210710_083713.jpg
फवाराचौकच्या सभोवताली ट्रालीधारक दुकानदार दुकाने लावत असल्याने वाहतुकीला होतो अडचन फवारा सुरु होण्याची मागणी...